मुंबई, दि. ११ प्रतिनिधी :
स्मार्ट मीटर रद्द केली पाहिजेत अशी मागणी करत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढला आहे. या मोर्चासंबंधी काँग्रेसकडून दोन दिवसांपूर्वी परवानगी मागितली होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर खासदार वर्षा गायकवाडांनी मुंबईतील बीकेसी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला.
स्मार्ट मीटरविरोधात काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला असून काँग्रेसकडून दोन दिवसांपूर्वी या आंदोलनाचं पोलिसांना पत्र देण्यात आलं होतं. मात्र सुरक्षेचा कारणास्तव पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. या मोर्चानंतर पोलिसांनी आंदोलकांच्या गाड्या ताब्यात घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मुंबईतील स्मार्ट मीटर विरोधात आज काँग्रेसचे मुंबईत वांद्रे बीकेसी परिसरामध्ये आंदोलन होणार होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली.यानंतर काँग्रेस नेते बीकेसी पोलीस ठाण्यात परवानगीसाठी दाखल झालेले आहेत. तर दुसरीकडे कार्यकर्ते हे पोलीस ठाण्याबाहेर करत घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत.
यावेळी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवा ड म्हणाल्या की, मुंबईतील स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात वीज बिल येत आहे. सर्वसामान्यांना ते परडवत नाही. या वाढलेल्या विजेच्या बिलाविरोधात आम्ही मोर्चा काढणार होतो. पण उद्योगपतींना पाठिंबा देणारे या सरकारने आणि पोलिस यंत्रणेने आमच्या मोर्चाला परवानगी नाकारली.
विजेचे बिल कमी झाले पाहिजे, स्मार्ट मीटर रद्द झाली पाहिजेत. राज्य सरकारला मध्यमवर्गीयांचा आवाज ऐकू येत नाही. आमच्या मोर्चाला परवानगी नाकारली नसून त्यांच्यामागे असलेल्या अदृश्य शक्तीचं हे काम आहे असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.