crime

सायबर भामट्यांनी पोलिसाचेच बँक खाते केले रिकामे

Share

नाशिक ,१० जून :

नाशिक भाजी बाजारात पोलिसाचा चोरीस गेलेल्या मोबाईलच्या माध्यमातून भामट्यांनी पोलीसाचे बँक खाते रिकामे केले आहे. ही रक्कम फोन पे आणि युपीआय आयडीवरून परस्पर कोलकत्ता येथील एका बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. देवळाली कॅम्प येथील पोलीस कर्मचा-यास सायबर भामट्यांनी हा गंडा घातला आहे.


या प्रकरणी दिपक सखाराम सरकटे (रा.पोलीस कॉर्टर बिल्डींग,दे.कॅम्प) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सरकटे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अंमलदार पदावर कार्यरत असून गेल्या रविवारी (दि.२) ते भाजीपाला खरेदी करण्यासाठी देवळाली कॅम्प येथील आठवडे बाजारात गेले होते. गर्दीत चोरट्यांनी हात की सफाई दाखवत त्यांच्या ओपो कंपनीच्या मोबाईलवर डल्ला मारला होता.

हा प्रकार सरकटे घरी परतल्यानंतर उघडकीस आला होता. दुस-या दिवशी पोलीसात तक्रार देण्याच्या तयारीत असलेल्या सरकटे यांना चोरट्यांनी दुसरा धक्का दिला.मध्यरात्री भामट्यांनी मोबाईलमधील फोन पे आणि युपीआय आयडीचा वापर करून सरकटे यांच्या बँक खात्यातील ९९ हजार रूपयांची रक्कम परस्पर ऑनलाईन कलकत्ता येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेगवेगळया दोन खात्यांवर वर्ग करून घेतली. त्यानंतर दुस-या दिवशी पुन्हा ९६० रूपयांची ऑनलाईन खरेदी करण्यात आल्याने अंमलदार असलेल्या सरकटे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिवाजी अहिरे करीत आहेत.

Related posts

दिल्लीतील ८ वर्षांच्या मुलीचे अपहरण, २४ तासांनंतर सुटका :

editor

भिवंडीत बनावट कंपनीच्या नावाने कापड व्यापाऱ्याची २३ लाखांची फसवणूक ; चौघांवर गुन्हा

editor

Gaza’s Rafah Tragedy: International Outcry After Deadly Israeli Strike

editor

Leave a Comment