भिवंडी , दि.16 नोव्हेंबर :
भिवंडी पश्चिम विधानसभेचे भाजप उमेदवार महेश चौगुले भिवंडी पूर्वचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संतोष शेट्टी या महायुतीच्या दोन उमेदवारांच्या प्रचारा करता शनिवारी भिवंडी शहरात राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते . या सभेस माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील,महायुतीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने राजस्थानी नागरीक या सभेस उपस्थित होते.
यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा म्हणाले की , ” 2014 च्या पूर्वी काँग्रेस सत्ताकाळात सर्वत्र घोटाळे घोटाळे सुरू होते.काँग्रेस भ्रष्टाचाराची जननी आहे.काँग्रेस व त्यासोबत जोडली गेलेली सर्व माणसे भ्रष्टाचारी आहेत.देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचे योगदान सुद्धा महत्त्वपूर्ण असणार आहे ,असे सांगत राजस्थान या जन्मभूमीतून महाराष्ट्र या कर्मभूमीत आलेल्या राजस्थानी समाजाचे अभिनंदन करतानाच जहाँ न पोहचे रेलगाडी वहा पोहचे बैलगाडी और जहाँ न पोहचे बैलगाडी वहा पोहचे मारवाडी ” असे सांगत आपल्या राजस्थानी समाजाचा गौरव केला आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करीत असताना विश्वभर नावलौकिक वाढीस लावला आहे.महाराष्ट्राला मजबूत बनवण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीने जाहीर केलेल्या संकल्प पत्राची अंमलबजावणी करणार असल्याने येथील दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी केले.