politics

एकनाथ शिंदे केंद्रात तर त्यांच्या चिरंजीवांना उपमुख्यमंत्री करतील – रोहित पवार

Share

पुणे , दि.29 नोव्हेंबर :

विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतरही सत्तास्थापनेवरून हालचालींचा वेग मंदावला होता. मात्र एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे आणि भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचा रस्ता मोकळा झाला आहे. ‘दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बैठकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली आणि शिवसेनेची कोणतीही आडकाठी नाही किंवा माझी कोणतीही अडचण नाही. हे स्पष्ट केल्याचे पाहायला मिळाले.

यावर शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांना मुख्यमंत्रिपद दिलं तर मी स्वतः जाऊन अभिनंदन करेन, पार्टी म्हणून नाही तर माझे काका म्हणून मी त्यांना शुभेच्छा देईल, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात केलेल्या प्रश्नावर रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

यासोबतच एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेवर बोलताना रोहित पवार म्हणाले, ‘एकनाथ शिंदे केंद्रात तर त्यांच्या चिरंजीवांना उपमुख्यमंत्री करतील’

Related posts

विशाळगड येथील दुर्दैवी घटना सरकार पुरस्कृत – विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल

editor

Supreme Court Declines Urgent Hearing on Arvind Kejriwal’s Plea for Bail Extension

editor

Final Lap: Key Battlegrounds and Campaign Blitzes in Indian Elections

editor

Leave a Comment