छत्रपती संभाजीनगर , दि.16 नोव्हेंबर :
महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2024 ची आदर्श आचारसहिंता निवडणुकीच्या अनुषंगाने गोलटगाव चौफुली जवळ जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर , राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त बातमीनुसार सापळा रचुन संशयीत वाहनाची तपासणी केली असता , वाहन क्रमांक. एमएच-21 बी.व्ही.6516 मध्ये मॅकडॉन नं.01 व्हीस्की, रॉयल स्टॅग व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हीस्की च्या प्रथमदर्शनी बनावट 180 मि.ली च्या एकूण 384 सिलबंद बॉटल मिळून आल्याने वाहनचालक आरोपी उमेश हरिचंद्र वाडेकर यास वाहनासह ताब्यात घेण्यात आले .
सदर आरोपींकडून अधीक चौकशी केली असता त्यांने दिलेल्या माहितीनुसार , जालना जिल्हयातील बदनापुर तालुक्यातील मांडवा गाव शिवारात डोंगराच्या पायथ्याशी बाळू वाघमारे याचे शेतातील एका पत्र्याच्या शेड मध्ये जावुन तपास केला असता त्याठिकाणी बनावट दारु बनविण्याचा कारखाना मिळून आला . सदर कारखान्यात बनावट तयार विदेशीदारु (ब्लेंड) 340 लिटर, तसेच इसेन्स, कॅरेमल व ब्लेंड घुसळणे कामी लागणारे यंत्र (मशीन) तसेच विविध विदेशी ग्रॅण्डच्या नविन बुचे (कॅप), व बनावट विदेशी दारु भरण्याकामी लागणा-या विविध बॅण्डच्या एकूण 2500 रिकाम्या बॉटल्स तसेच इतर साहित्य असा एकूण चारचाकी वाहनासह 12,92,150/- रुपयेचा दारुबंदी गुन्हयाचा बनावट मुददेमाल जप्त करण्यात आला असुन , आरोपी इसम नामे उमशे हरिचंद्र वाडेकर रा.मांडवा ता. बदनापुर जि. जालना यास अटक करण्यात आली आहे . अशी माहिती विभागीय भरारी पथक प्रमुख संगीता दरेकर यांनी दिली.
तसेच सदर गुन्हयाची कार्यवाही निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक छत्रपती संभाजीनगर विभाग अनिल वा. पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक. राजु के. अंभोरे, जवान सर्वश्री युवराज वी. गुंजाळ, उस्मान एस. सय्यद, प्रविण पी. जाधव, रिजवान एस. पठाण, शहवाज खान, वाहनचालक शाम आर. जोशी यांनी केली आहे.