Mahrashtra

‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी शेतकरी, पोलिस, स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केली गणरायाची आरती

Share

मुंबई, दि. ९ : 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाची आरती आज शेतकरी, पोलिस, स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया… मंगलमुर्ती मोरया या जयघोषाने वातावरण भारावून गेले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.

सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मान्यवरांनी वर्षा निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. हिंगोली जिल्ह्यातील लोहारा येथील काही शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. त्यांच्या हस्ते गणपतीची दुपारची आरती करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची घरे, शेती पूर्णपणे वाहून गेली. त्यासंदर्भात बालाजी आढळकर, सखाराम बोडके, उमेश चव्हाण हे शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. त्यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या शेतकऱ्यांची भेट घेऊन विचारपूस करीत त्यांना दिलासा दिला.

यावेळी वर्षा निवासस्थानी कर्तव्यावर असलेले पोलिस, स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते देखील यावेळी आरती करण्यात आली.

Related posts

आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या २१ शाखांचा दहावीचा निकाल १०० टक्के

editor

उबाठा गटातील दोन माजी नगरसेविकांचा शिंदेसेनेमध्ये पक्षप्रवेश

editor

६ एप्रिलच्या सावंतवाडी येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार

editor

Leave a Comment