Civics

पालघरला जलदिलासा

Share

पालघर(प्रतिनिधी) २ जुलाई :

पालघर जिल्ह्यातील धरणे व नद्या पावसाने वाहू लागल्या आहेत. काही धरणांचा पाणीसाठा हा ५० टक्क्यांहून अधिक झाला आहे. त्यामुळे पालघरला जलदिलासा मिळाला आहे. सातत्याने पाऊस झाला तर पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरून वाहू लागतील.त्यामुळे थेंबे थेंबे का होईना धरणातील पाण्याच्या टक्केवारीचा आलेख उंचावू लागला आहे.

पालघरमधील मनोर, माहीम केळवे, देवखोप, डहाणू येथील रायतळे, खोड, विक्रमगड, मानखुर्द यांसह लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या जव्हार तालुक्यातील डिमिहिरा व मोखाडा येथील वाघ याठिकाणी जलसाठा वाढू लागला आहे. एकीकडे धरणात उपयुक्त पाणीपातळी खालावली होती. त्यामुळे पाऊस झाला नाही तर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता होती; मात्र चांगला पाऊस पडत असल्याने जलाशये भरू लागली आहेत. सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था धरणातून होत असते. यासह औद्योगिक वसाहतीलादेखील पाणी मिळत असते. पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात धरणे आहेत. मध्य वैतरणा, तानसा मोडक, कुर्झे या धरणांतून मुंबईला पाणीपुरवठा होत आहे.


वसई-विरार शहराची लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे पाण्याची मागणीदेखील तितकीच आहे. सूर्या, पेल्हार व उसगाव धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. पुरेसे पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाकडून नव्या पाणीप्रकल्पाची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे भविष्यात देहरजे व खोलसापाडा एक व दोन प्रकल्पांतूनदेखील पाणी वसईला येणार आहे. सद्यःस्थितीत पालघर जिल्ह्यातील नदी व धरणात जलाशय टक्केवारी समाधानकारक दिसून येत आहे. पावसाने जोरदार हजेरी लावली तर वर्षभरात पाण्याची चिंता मिटू शकते.

कवडास बंधारा ७१.७९ टक्के, वांद्री मध्यम प्रकल्प ४४.२५ टक्के व धामणी धरणात १९.२२ टक्के पाणी उपलब्ध आहे. या तिन्ही धरणांत धामणी धरणाची क्षमता अधिक आहे. त्यामुळे वरुणराजाने जर कृपा दाखवली तर महत्त्वाच्या असणाऱ्या धामणी धरणात मुबलक साठा उपलब्ध होऊ शकतो.

Related posts

प्रत्येक आगारात साजरा होणार ” प्रवासी राजा दिन..! “-दर सोमवारी व शुक्रवारी आयोजन…-१५ जुलै पासून सुरुवात..

editor

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती उपक्रमांचे आयोजन

editor

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून : राज्याचा अर्थसंकल्प २८ जूनला

editor

Leave a Comment