accident Mahrashtra

मुंब्रा बायपासवर भीषण आपघात ; एक ठार तर तीन जखमी.

Share

ठाणे ,२७ मे :


२५/०५/२०२४ रोजी दुपारी १२:४० वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार वाय जंक्शन जवळ,

या ठिकाणी MH 04 FD 8469 टाटा हेवी ट्रक (मालक:- आशिष सावला, चालक:- अज्ञात/ मार्ग: तुर्भे ते मानकोली) या वाहनाने MH 04 KF 0670 टाटा एस (मालक / चालक:- भोलेनाथ सिंग / मार्ग – विक्रोळी ते मुंब्रा) वाहनाला समोरून धडक दिल्याने बाजूच्या रशिद कंपाऊंड रस्त्यावर पडून अपघात झाला.

सदर घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस कर्मचारी – ०२ क्रेन मशीनसह, मुंब्रा पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी ०१- आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१- पिकअप वाहनासह उपस्थित होते

.
घटनास्थळी अपघातामध्ये रशिद कंपाऊंड रस्त्यावरून जाणाऱ्या ०३ नागरिकांना दुखापत झाली असून त्यांना नजीकच्या मेडफोर्ड रुग्णालयात तसेच ०१- व्यक्तीचा मृत्यू असून त्यांना पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे पाठविण्यात आले असून त्यांची माहिती खालीलप्रमाणे:-
१) झाहीद रफिक खान (पु / १८ वर्षे / किरकोळ दुखापत झाली असून उपचार सुरू आहेत.)
२) भोलेनाथ सिंग (पु / ३५ वर्षे / किरकोळ दुखापत असून उपचार सुरू आहेत.)
३) झाहीद अन्सारी (पु / ३५ वर्षे / गंभीर दुखापत झाली असून आय.सी.यू. मध्ये उपचार सुरू आहेत.)
४) सय्यद लाल अहमद जीलानी (पु / ६९ वर्षे / उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.)
सदरची अपघातग्रस्त वाहने शहर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून बाजूला करण्यात आली असून सदरचा रोड वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे,

Related posts

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत इसमाने केली दोघांची ८० लाखांची फसवणूक

editor

१२ आयएस अधिकारी प्रतिक्षेत असताना आयआरएस अधिकारी सुधाकर शिंदे प्रतिनियुक्तीवर राज्यात कसे ? – सुनील प्रभू

editor

शेंद्रा एमआयडीसीच्या रेडीको एनव्ही कंपनीमध्ये मका साठवून ठेवणारी टाकी वेल्डिंग करताना कोसळली; चार कामगारांचा मृत्यू,एक गंभीर जखमी

editor

Leave a Comment