crime

गडचिरोलीत चकमकीत पाच नक्षलवादी ठार

Share

गडचिरोली , दि. 23 ऑक्टोबर :

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक च्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये विध्वंसक कारवाया करुन घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मागील तीन ते चार दिवसांपासून काही नक्षली एकत्र येऊन कट रचण्याच्या तयारीत असून ते , महाराष्ट्र व नारायणपूर, छत्तीसगड सिमेलगत असलेल्या कोपर्शी जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या विकाणी तळ ठोकून बसलेले असल्याच्या माहिती मिळाली होती.

गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाच्या २१ तुकड्या व सिआरपीएफ क्यूएटीच्या ०२ तुकड्या तातडीने कोपर्शी जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी माओवाद विरोधी अभियान राबविणेकामी रवाना करण्यात आल्या. नक्षल्यानी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरु केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणासाठी गोळीबार केला. पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षली घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर ०२ पुरुष व ०३ महिला असे एकुण ०५ नक्षली मृत अवस्थेत आढळले.
1) जया पदा , कांकेर, छत्तीसगड कंपनी दहा डी व्ही सी एम
2) सावजी तुलावी , धानोरा, गडचिरोली, डिव्हीसीएम, सप्लाय टीम सदस्य
3) देवी रिता सप्लाय , बस्तर, सप्लाय टीम सदस्य
4) बसंत, बस्तर, बस्तर, सप्लाय टीम सदस्य
5) सुखमती , कंपनी 10, सप्लाय टीम

मृत नक्षल्यांवर चकमक, जाळपोळ व खुन इ. वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. यासोबतच सदर घटनास्थळावरुन ०५ अग्निशस्त्र हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे. चकमकीत गडचिरोली पोलीस दलाचे एक पोलीस जवान कुमोद प्रभाकर आत्राम हे जखमी झाले आहेत. अभियानादरम्यान त्यांना हेलीकॉप्टरच्या मदतीने तातडीने बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारकामी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहे. २०२१ पासून गेल्या तीन वर्षात गडचिरोली पोलीसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ८५ कट्टर माओवाद्यांना कंठस्नान, १०९ माओवाद्यांना अटक करण्यात आले आहे व ३७ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.

Related posts

Karnataka CM Seeks Revocation of MP Revanna’s Diplomatic Passport

editor

Arrest of ‘Bhiku Mhatre’: Karnataka’s Social Media Storm

editor

जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून निवडणूक कालावधीत आतापर्यंत 24 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

editor

Leave a Comment