politics

माजी खासदार डॉ. हिना गावित यांचा भाजप सदस्य पदाचा राजीनामा

Share

नंदुरबार , दि.5 नोव्हेंबर :

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या व नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉ हिना गावित यांनी भारतीय जनता पार्टीच्या सदस्य पदाच्या राजीनामा दिला आहे. डॉ हिना गावित ह्या अक्कलकुवा अकरांनी या मतदारसंघात उमेदवारी करण्यासाठी इच्छुक होत्या त्यांनी तेथे भाजपकडून उमेदवारी मिळण्याची वरिष्ठांकडून मागणी देखील केली होती परंतु तेथील जागा ही शिवसेना शिंदे गटाला सुटल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे.

परंतु राजीनामा देण्याचे कारण वेगळे असून भाजपचे मित्र पक्ष असलेले शिवसेना ही सातत्याने भाजपच्या विरोधात प्रचार करत आहे. महाराष्ट्राच्या महायुतीमधील प्रमुख मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटांच्या शिवसेनेचे जिल्हा नेते विरोधी काँग्रेस पक्षाचा सर्वकाळ मदत करत असते. लोकसभा मतदारसंघात देखील उमेदवारी मिळू नये इथपासून तर पराभूत करण्यापर्यंत त्यांनी भूमिका बजावली आहे. तरीही वरिष्ठ स्तरावरुन त्यांना आवर घालण्यात आले नाही. हेच आता विद्यमान विधानसभा निवडणुकीत सुद्धा घडवले जात आहे. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते उघडपणे काँग्रेस उमेदवारासाठी प्रचार करून भाजपचे उमेदवार डॉ विजयकुमार गावित यांच्या पराभवासाठी प्रयत्न करत आहेत. विधानसभा निवडणुकीत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून जर मी निवडणूक लढवली तर भारतीय जनता पार्टीचा एक आमदार वाढू शकतो म्हणून मी उमेदवारी मागितली तरी शिंदे गटाच्या शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी यांच्या आग्रह धरून शिवसेनेला जागा दिली. शिवसेने संदर्भात सर्व राजकीय घटनाक्रम पक्षातील वरिष्ठांना निदर्शनास आणून दिले तरी देखील त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही म्हणून मी माझी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेले अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे.

म्हणून भारतीय जनता पार्टीचे जबाबदार सदस्य असताना महायुतीमधील वातावरण बिघडू नये आणि घटक पक्षामधील अंतर वाढू नये यासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या सदस्य पदाच्या राजीनामा देत असल्याचे डॉ. हिना गावित यांनी सांगितले आहे.

Related posts

संजय राऊत यांनी रोखठोकमधून आकलेचे तारे तोडले – बावनकुळे

editor

लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या जागा वाटपात अंतर्गत कुरघोडीचा वाद उफाळणार ? पक्षश्रेष्ठींनी जागा वाटपाच्या तिढ्याबाबत विचाराने निर्णय घेण्याची वेळ !भिवंडी विधानसभेत २ आमदार हॅट्रिकवर ,१ चौथ्यांदा नशीब आजमवणार

editor

मुख्यमंत्री सह्याद्रीतुन बाहेर पडताच रोखला ताफा

editor

Leave a Comment