Share
भाजपा नेते आ.अँड.आशिष शेलार यांची विधानसभेत मागणी
मुंबई प्रतिनिधी , ९ जुलाई :
ज्यावेळी सर्व लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या कामात होते,त्यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे मुंबईतील मोठे नाले,छोटी गटारे यांची सफाई कंत्राटदाराने योग्य केली नसल्यानेच नाल्यातील गाळ पुर्ण निघाला नाही,आणि काढलेला गाळ उचलला गेला नाही.आम्ही त्यावेळीच दौरा करुन ही बाब पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.त्यानंतर ही कामे झाली नाहीत. म्हणून मुंबईच्या नालेसफाईची श्वेतपत्रिका काढा,अशी मागणी भाजप नेते व आ.ॲड.आशीष शेलार यांनी सोमवारी थेट विधानसभेत केली.