Uncategorized

मतपेट्या ठेवण्यात आलेल्या शासकीय ठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त

Share

ठाणे :

लोकशाहीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया काल पार पडली असून येत्या चार तारखेला दिल्लीतील संसदेत कोण पोहोचणार यावर शिक्कामोर्तब होईल. मात्र काल झालेल्या मतदानाच्या पेट्या संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी सील करत त्या शासकीय जागेमध्ये पोलीस निगराणीत ठेवल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यात तीन लोकसभा येत असून यात ठाणे , भिवंडी आणि कल्याण लोकसभेचा समावेश आहे. मतदारांना मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाकडून एकूण सहा हजार सहाशे पाच मतदान केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. यामध्ये ठाण्यात ४५% , भिवंडी येथे ४८% तर कल्याण लोकसभेत ४७% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी मतदान पेट्या सिल करत पोलीस निगराणीत प्रत्येक लोकसभेच्या सेंटर पॉइंटवर सुरक्षितपणे ठेवल्या आहेत. ठाणे लोकसभेच्या मतदान पेट्या ठाण्यातील आनंदनगर येथील होरायझन शाळेत ठेवण्यात आल्या आहेत. भिवंडी येथील पेट्या पद्घा रोडवरील वूड गोदाम स्कूल मध्ये ठेवण्यात आल्या आहेत तर कल्याण लोकसभेच्या पेट्या डोंबिवली क्रीडा संकुल निवडणूक अधिकारी कार्यालय येथे ठेवण्यात आले आहेत. या पेट्या चार जून पर्यंत पोलीस सुरक्षेत ठेवण्यात येणार आहे.

Related posts

रस्ते अपघातात जखमी झालेल्या जैन साध्वीच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून

editor

.. आणि उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकाच लिफ्टमध्ये

editor

Across Mumbai 9 Jan Marathi

editor

Leave a Comment