Civics

कल्याण बस डेपोत प्रवाशांची मोठी गर्दी

Share

कल्याण , ८ जुलाई :

पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळित होताच प्रवाशांकडून पर्यायी सेवेचा शोध सुरू झाला आहे. कल्याण बस डेपोत प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला असताना बस डेपोत सुद्धा पुरेशा बसेस उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत.

कल्याण ठाणे सह मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे पहाटेपासूनच रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक लोकल रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. प्रवास करणे गरजेचे असलेल्या प्रवाशांकडून रेल्वेला पर्याय सेवेचा शोध सुरू झाला आहे. बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेनंतर बसचा पर्याय निवडण्याचा प्रयत्न केला मात्र इथेही त्यांच्या पदरी काहीशी निराशाच पडत असलेली दिसत आहे

Related posts

डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथील नागरिकांनी पाण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना घातला घेराव

editor

Tragic Boiler Explosion at Chemical Plant in Dombivli Leaves Four Dead and 30 Injured

editor

महायुतीला ४० हुन अधिक जागा मिळणार ; भाजपा आ. दरेकरांनी व्यक्त केला विश्वास

editor

Leave a Comment