मुंबई प्रतिनिधि, ८ जुलाई :
पत्नीने दारू पिऊन आलेल्या पतीला तू दारू पिऊन का आलास हे विचारल्याने संताप अनावर झालेल्या पतीने घरात असलेल्या धारदार भाजी कापण्याच्या विळतीने पत्नीवर वार केले, व त्यानंतर घरात असलेली अवजड चार्जिंग ची बॅटरी देखील मद्यपी पतीने पत्नीच्या डोक्यात मारल्याने या घटनेत पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे घडली
साक्री तालुक्यातील पिंपळनेरपासून जवळ असलेल्या धामणधर गावात ही घटना घडली असून, धाकलू चुनीलाल गायकवाड असे मारेकरी पतिचे नाव आहे. काल रात्री नशेच्या भरात पतीने हे कृत्य केल्यानंतर तो झोपी गेला परंतु रात्रभर घरात रक्ताच्या थारोळ्यात पत्नी तशीच पडून असताना, आजूबाजूच्या नागरिकांना ही बाब समजताच त्यांनी मयात झिंगुबाई गायकवाड च्या नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर मृत झिंगुबाई गायकवाड च्या भावाने घटनास्थळी धाव घेत बहिणीला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. याबाबत साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलिसांनी तात्काळ मारेकरी पतीच्या मुसक्या आवळल्या असून त्या विरोधात नवीन कलमान्वये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.