नवी मुंबई , दि.29 नोव्हेंबर :
तुंगा हॉटेल, वाशी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार मंदा म्हात्रे यांनी आगामी योजनांचा आढावा घेत विरोधकांवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, “पैशाच्या आणि दादागिरीच्या जोरावर मतदान खेचणाऱ्या नेत्यांपेक्षा मी माझ्या कामाच्या जोरावर तीन वेळा निवडून आले आहे. नवी मुंबईच्या जनतेने मला पाठिंबा दिला आहे.”
आगामी पाच वर्षांत नवी मुंबईत सौरऊर्जेवर आधारित विजनिर्मिती प्रकल्प राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. नागरिकांसाठी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी 100% प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
मंदा म्हात्रे यांनी विरोधकांवर निशाणा साधत सांगितले, “विरोधकांनी केवळ टीका केली, पण आम्ही विकासकामे केली. आम्हाला घरोघरी भेटून पाठिंबा मागायची वेळ नाही, कारण जनतेला माहित आहे की नवी मुंबईचा खरा विकास कोण करतो.”
जनतेला माहित आहे की, शहराला कोणाच्या हातात सोपवायचे आहे. आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनीच आम्हाला सतत निवडून दिले आहे.
पैशाच्या आणि दादागिरीच्या जोरावर मतदान केले नाही. 91 हजार लोकांनी मतदान केले एकही पैसा न देता सलग्न तीन वेळा निवडून आले. मंत्रीपेक्षा मी स्वतःला बारी समजते,” असंही मंदा म्हात्रे म्हणाल्या.