Civics Mahrashtra

नाले तुंबून नागरिकांच्या घरात पाणी घुसल्यास, दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुदडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी- रोहिदास मुंडे

Share

मुंबई,१० जून :

दिव्यात नालेसफाईची कामे पूर्ण क्षमतेने झालेली नाहीत. जर या पावसाळ्यात नालेसफाई पूर्ण क्षमतेने न झाल्यामुळे नागरिकांच्या बैठ्या घरांमध्ये पाणी शिरल्यास किंवा दुर्घटना घडल्यास दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना जबाबदार धरून निलंबित करावे अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे.

दिवा प्रभाग समितीचे प्रमुख अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त हे कमी पडत असून दिवा शहराचा संपूर्ण पाहणी दौरा त्यांनी पावसाल्या आधी करणे अपेक्षित होते. अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण गाळ काढला गेलेला नाही. वरच्या प्लास्टिकच्या पिशव्या काढण्यात आलेल्या आहेत. नाले पूर्ण क्षमतेने साफ न केले गेल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास पाणी नागरिकांच्या घरात घुसण्याची शक्यता असते. दरवर्षी हा प्रकार पावसाळ्यात दिव्यात पाहायला मिळतो. मागील घडलेल्या घटनांवरून दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त धडा घेणार नसतील तर कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी रोखठोक भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी घेतली आहे.

दिवा शहरात पालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून सहाय्यक आयुक्त नीट जबाबदारी पार पाडणार नसतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे. यामुळे प्रशासनाला शिस्त लागेल आणि दिवा शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिकाऱ्यांचा बदलेल असेही रोहिदास मुंडे यांनी म्हटल आहे.दिवा शहरात जो गलिच्छपणा व अस्वच्छता अनेक ठिकाणी पाहायला मिळते त्याबाबत सुद्धा सहायक आयुक्तांनी भूमिका घेणे अपेक्षित होते मात्र ठाण्याला एक न्याय आणि दिवा शहराला एक न्याय अशा पद्धतीचे प्रशासन येथे काम करणार असेल तर अशा प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

Related posts

उबाठा गटातील दोन माजी नगरसेविकांचा शिंदेसेनेमध्ये पक्षप्रवेश

editor

अनधिकृत पेट्रोल पंपाला परवानगी देणाऱ्या त्या’ अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करा घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी आ. दरेकरांची मागणी

editor

हळदीच्या कार्यक्रमात लावलेल्या डिजेने घेतला तरूणाचा जीव

editor

Leave a Comment