छ.संभाजीनगर , दि.18 नोव्हेंबर :
सोयाबीन पिकाला हमीभाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत होते तसेच त्याच्या ओलाव्याचे प्रमाण शासनाने 12 टक्क्यांपर्यंत देऊन ज्यांच्याकडे 12 टक्क्यांच्यावर ओलावा आहे ते पीक बाजारात विक्रीसाठी जात नव्हते, मात्र या सर्व गोष्टींचा राज्य सरकारने विचार करत 15 टक्क्यांपर्यंत ओलावा असलेले पीक घेण्याचा चांगला निर्णय घेतला आहे तसेच बाजारामध्ये शेतकऱ्यांना अजून भाव वाढून मिळू शकतात का यासाठी देखील सरकारने उपाययोजना केल्या आहेत. भारताने सोयाबीनची पेंड निर्यात करायचे देखील ठरवले आणि तसे हजार रुपये अनुदान देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी माहिती भाजप आणि शेतकरी नेते पाशा पटेल यांनी दिली आहे.
लोकसभेला राहुल गांधी अदानीच्या विरोधात फार बोलत होते पण एक दिवस अचानक त्यांच्या भाषणातून आदानी निघून गेला. शरद पवार अदानीच्या हेलिकॉप्टर शिवाय फिरत नाहीत किंवा शरद पवार यांच्या प्रत्येक कार्यक्रमात अदानी दिसतात . पण पडद्याच्या मागे गेले तर काय आहे हे जनतेला सर्व माहित आहे, यांचाच प्रोडक्ट आहे ते पण, आमच्या नावाने खडे फोडायचे काही कारण नाही अशी टीका पाशा पटेल यांनी राहुल गांधी व शरद पवार यांच्यावर केली आहे.