crime Mahrashtra

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत इसमाने केली दोघांची ८० लाखांची फसवणूक

Share

नवी मुंबई ,२८ मे :

सीबीआय विभागात तात्पुरता चालक असलेल्या एका व्यक्तीने कोल्हापूर मधील एका वन विभागाच्या पाचशे एकर जमिनीचे खोटे कागदपत्र तयार करून दोघांची तब्बल ८० लाखांची फसवणूक केली आहे. ही घटना नवी मुंबईत घडली आहे.

आरोपी सुनील धुमाळ यांनी आपण सीबीआयमध्ये अधिकारी असल्याचे सांगून दोघांची फसवणूक केली आहे. या आरोपीवर सीबीडी बेलापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे तसेच या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे अशी प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश गोरे यांनी दिली आहे.

Related posts

वासिंद रेल्वे स्थानकात महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी केली अटक

editor

विधान परिषद सभापती निवड झाल्याबद्दल जपानच्या महावाणिज्यदूतांनी घेतली प्रा. राम शिंदे यांची सदिच्छा भेट

editor

अंबादास दानवे पाच दिवसांसाठी निलंबित ; विधान परिषदेत बहुमताने ठराव मंजूर

editor

Leave a Comment