Mahrashtra politics

लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या जागा वाटपात अंतर्गत कुरघोडीचा वाद उफाळणार ? पक्षश्रेष्ठींनी जागा वाटपाच्या तिढ्याबाबत विचाराने निर्णय घेण्याची वेळ !भिवंडी विधानसभेत २ आमदार हॅट्रिकवर ,१ चौथ्यांदा नशीब आजमवणार

Share

भिवंडी ,१० जून :


नुकत्याच पार पडलेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीत ठाणे,नाशिक,रत्नागिरी – सिंधुदुर्ग, उत्तर मुंबई आदि जागा वाटपावरून आणि महाविकास आघाडीभिवंडी लोकसभा क्षेत्रासह सांगली व जालन्यात जागा वाटपाच्या तिढ्याने अंतर्गत कुरघोडीचा मुद्दा चांगलाच गाजला.याच पार्श्वभूमीवर काही महिन्यांनी १५ व्या राज्य विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात होऊन उमेदवारी तिकीटासाठी दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत.त्यामुळे आतापासूनच आमदारकीच्या जागा वाटपाच्या तिढ्यात भिवंडी विधानसभा क्षेत्रातील अंतर्गत कुरघोडीच्या वादात पक्षश्रेष्ठीला विश्वासात घेऊन निवडणूक लढवून कोणता उमेदवार तिकीट मिळवून विजयश्री खेचून आणणार ? आणि कोणाची विकेट पडणार याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान २०१९ मध्ये नोव्हेंबर मध्ये पार पडलेल्या भिवंडी विधानसभा निवडणुकीत भिवंडी पूर्वेतून शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे त्यांच्याच जवळच्या माणसांनी माजी आमदार रुपेश म्हात्रे यांना सपाचे विद्यमान आमदार रईस शेख यांच्या विरुद्ध अवघ्या १३१४ मतांनी पराभवाचा लाल कंदील दाखवल्याचे नागरिकांमधून बोलले जात होते.तर २०१९ नंतर प्रथमच २०२४ मध्ये राजकीय पक्षफुटी होऊन गट स्थापनेने लोकसभेची निवडणूक पार पडली.या निवडणूक निकालाच्या आकडेवारीनुसार,विशेषतः महाराष्ट्रात महविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा झालेल्या सामन्यात मविआने ४८ पैकी ३० जागा जिंकत गड राखण्यात यश मिळवल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे लोकसभेतील आकडेवारीच्या अनुषंगाने सर्वच विद्यमान आमदारांनी जातीय समीकरणाचे गणित आणि अंतर्गत कुरघोडीच्या वादाचा धडा घेऊन पुढील तयारीस लागण्याचे सूचकपणे दिसून येत आहे.तसेच राज्यासह देशातील लोकसभा निकालातून भाजपा आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवून किती जागा राखण्यात यशस्वी होते.हे पाहणे महत्वाचे ठरणार असून मविआतील घटक पक्षांचे विभाजन होऊन त्यांनाही विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवावी लागणार असल्याने प्रत्येक घटक पक्षाची स्थानिक पातळीवरील ताकत उघड होणार आहे.त्यामुळे आमदारकीची निवडणूक औत्सुक्याची पाहायला मिळणार आहे.

दरम्यान लोकसभा निवडणूक निकालानंतर जागा वाटपाच्या तिढ्याचे गणित सोडवण्यात अपयशी ठरून हार पत्कराव्या लागणाऱ्या राजकीय घटक पक्षांना स्वतः च्या प्राबल्याच्या अस्तित्वासाठी काही महिन्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांसह पदाधिकारी,कार्यकर्त्यांची अंतर्गत कुरघोडी दूर करून जागा वाटप करण्याची वेळ आल्याचे स्पष्ट होत आहे.यासह लोकसभा निवडणूक २०२४ प्रमाणेच राजकीय पक्षांचा विधानसभा निवडणुक जागा वाटपाचा तिढा कायम राहून अंतर्गत कुरघोडी डोके वर काढून रस्सीखेच होणार का ? असा प्रश्नही आगामी २०२४ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहे.एकीकडे भिवंडी विधानसभेत दोन आमदार हॅट्रिकवर तर तिसरा आमदार चौथ्यांचा नशीब अजमवणार आहे.यामध्ये भिवंडी ग्रामीणमधून अनुसूचित जमातीतील राखीव जागेतील दोन वेळचे शिवसेनेचे परंतु विद्यमान शिंदे गटाचे आमदार शांताराम मोरे यांना बंडखोरीसह लोकसभेतील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना लोकसभेत ग्रामीणमधून मिळालेल्या मतांनी आगामी विधानसभा निवडणुकीत सावधतेचा इशारा असल्याचे समोर आले आहे.दुसरीकडे भिवंडी पश्चिममध्ये भाजपाचे विद्यमान आमदार महेश चौघुले हे यावेळी हॅट्रिकवर असणार आहेत.

विशेष म्हणजे चौघुले यांनी २०१४ विधानसभा निवडणुकीत तत्कालीन काँग्रेसचे शोएब (गुड्डू) खान यांचा ३ हजार ३२६ मतांनी आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या खालिद गुड्डू यांचा १४ हजार ९१२ मतांनी पराभव केला होता.या मागील दोन वेळच्या प्राप्त आकडेवारी नुसार चौघुले मुस्लिम मतांच्या समीकरणाने विजयी केल्याचे चित्र आहे.तर मुरबाड विधानसभा मतदार संघातून २००९ साली राष्ट्रवादीतून निवडूण आलेले किसन कथोरे भाजप पक्ष प्रवेशानंतर २०१४ – १९ मध्येही निवडूण आले आहेत.यंदा ते चौथ्यांदा नशीब आजमावणार असून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत किसन कथोरे यांना कपिल पाटलांच्या सोबत असलेल्या राजकीय वैरामूळे निवडणूक कठीण जाणार असल्याचे उघड होत आहे.दरम्यान याच पक्षा अंतर्गत वाद आणि जातीय समीकरणाच्या फटक्यामुळे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची हॅट्रीक हुकल्याचे भिवंडी लोकसभा मतदार संघातून बोलले जात आहे.

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतांच्या जातीय समीकरणासह पक्षा अंतर्गत कुरघोडीचा सामना सर्वच उमेदवारांना करावा लागण्याची चिन्हे दिसून येत असल्याने पक्षा पक्षातील अंतर्गत वादाचा फटकाच विधानसभा निवडणुकीचा निकाल ठरवणार असल्याची चर्चा तालुका वर्तुळात रंगू लागली आहे.

Related posts

Union Minister Jyotiraditya Scindia’s Mother Passes Away at AIIMS, Delhi

editor

Samruddhi Mahamarg Nears Completion in Thane District

editor

मालसाणे शिवारात एस.टी. बसची कंटेनरला धडक; पंधरा जण जखमी

editor

Leave a Comment