Mahrashtra politics

महाराष्ट्रात भाजपाला देवेंद्रजींचेच नेतृत्व ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

Share

मोदी सरकारच्या नवीन योजना मतदारांपर्यंत पोहचविणार जुलै महिन्यात भाजपाची धन्यवाद यात्रा

मुंबई प्रतिनिधी ,दि २० जून :

महाराष्ट्रात भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून तेच राज्याचे नेतृत्त्व करतील, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सर्व विधिमंडळ सदस्यांनी आणि प्रदेश भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती केली आहे.

बुधवारी सकाळी नागपूर विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढील पाच वर्षांच्या महाराष्ट्र विकासाच्या योजना त्या महाराष्ट्रात आणण्यासाठी महायुतीचे सरकार काम करेल, त्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आवश्यक आहेत. दिल्लीमध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेविषयी ते म्हणाले की, ज्या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अर्धा टक्केपेक्षा कमी मतांनी मागे राहिला, त्याविषयी केंद्रीय नेतृत्वासोबत कारणांची चर्चा व विचार विनिमय केला. जेथे कमी पडलो आहोत, त्या ठिकाणी अधीकचे काम करून विधानसभेत ही पोकळी भरून काढण्यासाठी काम करू, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात धन्यवाद यात्रा

लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या पाठबळाबद्दल धन्यवाद व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात भाजपा धन्यवाद यात्रा काढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढील ५ वर्षात होणारी विकासकामे व योजनांचा लाभ महाराष्ट्रातील जनतेला व महाराष्ट्राच्या विकासासाठी व्हायला हवा. महाराष्ट्रातील सर्व आमदार-खासदार, संघटनेतील सर्व पदाधिकारी जुलै महिन्यात धन्यवाद आभार दौरा करणार आहे, ज्या मतदारांकडे आम्ही मत मागण्यासाठी जाऊ त्यांना मोदी सरकारच्या नवीन योजना देखील पोहचवणार आहोत.

शरद पवार म्हणाले की मोदींनी माझ्यावर प्रत्येक सभेत टीका केली हे माझे भाग्य आहे, शरद पवार यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले, शेतकऱ्यांच्या मदतीने आम्ही सत्ताबदल करू असे विधान केले या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले,की पंतप्रधान मोदींनी एखाद्या शब्दाने टीका केली, तुम्ही मागील दीड वर्षापासून मोदीजींना काय काय बोलत आहात याची महाराष्ट्राच्या जनतेनेही नोंद घेतली आहे.यशाने ते थोडे हुरळले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर किती खालच्या पातळीवर टीका करण्यात आली या गोष्टीचा अभ्यास शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा केला पाहिजे.अत्यंत तुच्छ आणि गलिच्छ पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे.शरद पवार यांनी या गोष्टीचे आकलन केले पाहिजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द बोलले तर एवढे लागले, महाविकास आघाडीच्या लोकांनी नरेंद्र मोदी यांना काय काय बोलले आहे या गोष्टीचे आकलन शरद पवार यांनी केली पाहिजे

विधानसभेत अजित पवार महायुतीसोबत असणार आहे का ?

महायुतीच्या सर्व नेत्यांना एकत्र काम करत महायुतीच्या माध्यमातून पुढे जायचे आहे आणि महायुतीला पुढे नेण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे.अजित पवार गटाकडून सांगण्यात येत आहे की अजित पवार यांना टार्गेट केले तर आम्ही आमचा वेगळा विचार करू- यावर ते म्हणाले की,कोणी आणि का म्हटले… आमच्याकडून असे कोणी बोललेले नाही, आमच्याकडून असा कोणी प्रयत्न देखील करत नाही.ज्यांनी ज्यांनी असा प्रयत्न केला त्यांना लखलाभ, आमच्याकडून अशी कोणतीही भूमिका नाही.

छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चांबाबत…

छगन भुजबळ यांना विचारावे लागेल की त्यांची नाराजी काय आहे.भुजबळ यांच्या भूमिकेबद्दल मी माझे मत व्यक्त करणे योग्य ठरणार नाही.

मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही याबाबतची काळजी सरकारने घेतली पाहिजे, अशी भूमिका आमची पहिल्यापासून आहे.

एकनाथ खडसे यांना महाराष्ट्रात कोणती जबाबदारी मिळू शकते ?

एकनाथ खडसे अजून भाजपामध्ये नाही, जेव्हा भाजपात येतील तेव्हा बघू.

महायुतीच्या समन्वय समितीची नेमणूक झाली का ?

आमचे विधानसभा निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव आल्यानंतर सविस्तर चर्चा करतील.

नाना पटोले यांच्यावर टीका करताना म्हणाले की, नाना पटोले इतक्या खालच्यास्तराला गेले आहेत की शेतकऱ्याला पाय धुवायला लावत आहे.महाराष्ट्राला अशोभनीय प्रकार नाना पटोले यांनी केला आहे.इंग्रजांच्या काळात ज्या पद्धतीने देश गुलामगिरीत होता, काँग्रेसने पुन्हा इंग्रजांचा काळ आणला आहे.इंग्रजांच्या काळातील जी मानसिकता होती, ती नाना पटोले यांनी स्वीकारली आहे.नाना पटोले यांचा मी निषेध करतो.नाना पटोले यांनी त्यांच्या पदाचा आणि व्यक्ती म्हणून स्वतःचा देखील अपमान केला आहे.नाना पटोले यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे.शेतकरी, कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीने पाय धुऊन घेणे हे शोभणारे नाही, या गोष्टीचे आत्मचिंतन नाना पटोले यांनी केली पाहिजे.भविष्यात पटोले यांनी स्वतःचा झालेला बुद्धिभेद दुरुस्त केला पाहिजे

Related posts

कोपरखैरणे विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

editor

उत्तर पश्चिमच्या जागेसंदर्भात कोर्टची लढाई लढणार -आदित्य ठाकरे

editor

British PM Rishi Sunak Clarifies Call for July 4 Snap Elections

editor

Leave a Comment