उल्हासनगर , दि २१ जून :
उल्हासनगर शहरात सकाळ पासुनच जोरदार पावसाला सुरवात झाली असुन या धुव्वाधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरात निट साफ सफाई झाली नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरुन वाहत होते . त्यामुळे या पहिल्या पावसातच महापालिकेच्या साफ सफाई ची पोलखोल झाली आहे. नाले सफाईचा ठेका हा झापी कंपनीला दिला असुन या कंपनीने व्यवस्थित सफाई केली नसल्याचे चित्र या पहिल्या पावसात बघायला मिळाले आहे.
उल्हासनगर शहरात आज सकाळ पासुनच जोरदार पावसाला सुरवात झाली असुन या पावसामुळे सर्वत्र पाणी साचले होते. कॅंप ३ येथील के बी रोडवरील डर्बी हॉटेल च्या बाजुला रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पुर सदृष्य स्थिती निर्माण झाली होती. तर सी एच कॉलेज समोर सुध्दा पाणी साचले होते. ऐवढेच असुन नाल्यांची सफाई ही व्यवस्थित झाली नसल्याने नाल्यांचे पाणी हे रस्त्यावरुन वाहत होते . शहरात भुयारी गटार योजने अर्तंगत खोदलेल्या रोडचे व्यवस्थित डांबरीकरण झाले नाही त्यामुळे रोडवर खड्डे पडले आहेत . कॅंप ४ येथील संभाजी चौक येथुन अग्निशमन दलाची गाडी जात असतानाच रोड च्या एका खड्ड्यात फसली. मात्र वाहन चालकांच्या प्रसंगावधानामुळे गाडी पलटी झाली नाही. दरम्यान शहरातील नाले सफाईची पोलखोल मात्र पाहिल्याच पावसात झाली असुन झापी कंपनी ने सफाई कामात दिरंगाई केल्यामुळे पाणी साचल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत . वालधुनी नदी मध्ये सुध्दा काही ठिकाणी बांध बांधलेले आहेत ते सुध्दा या झापीच्या ठेकेदाराने काढले नाहीत . त्यामुळे नदीला पुर आला तर काठावरील नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे. तेव्हा आयुक्त अझिझ शेख यांनी वालधुनी नदीची पाहणी करावी अशी मागणी होत आहेत.