छत्रपती संभाजीनगर , दि.18 नोव्हेंबर :
छत्रपती संभाजीनगर शहरातील झाल्टा फाटा व सिडको एन 7 मधील आंबेडकर नगर मधून राज्य उत्पादन शुल्क विभागाने जवळपास दोन दिवसात 7 लाखाचे मद्य जप्त केले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाला आंबेडकर नगर मध्ये अवैद्य पद्धतीने मद्य विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती ; त्यावरून त्या ठिकाणी विभागाने कारवाई करून जवळपास दोन दिवसात 7 लाखाचे मद्य जप्त केले आहे.
झाल्टा फाटा परिसरातील हॉटेल कार्तिकी ढाबा या ठिकाणी काही मद्यपी अवैधरीत्या मद्यपान करत असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे, मात्र मद्य विकणारा आरोपीने पळ काढला. तसेच सिडको एन 7 आंबेडकर नगर मध्ये अवैधरीत्या दारूचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्या ठिकाणी छापा मारत एकूण एक लाख रुपये किंमतीचा मद्य साठा जप्त केला आहे. या मधील आरोपींचा शोध सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.