Mahrashtra

भारतीय लष्कराच्या नाशिक इथल्या तोफखाना केंद्रातील कुमारमंगलम तोफखाना संग्रहालयाचे उद्घाटन

Share

नाशिक, १ जुलै २०२४ :

भारतीय लष्कराच्या नाशिक इथल्या तोफखाना केंद्रातील नूतनीकरण केलेल्या कुमारमंगलम तोफखाना संग्रहालयाचे आज उद्घाटन झाले. देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल परमशिव प्रभाकर कुमारमंगलम यांच्या जयंतीनिमीत्त आज या नुतनीकरण झालेल्या तोफखाना संग्रहालयाचा भव्य उद्घाटन समारंभ झाला. कुमारमंगलम तोफखाना संग्रहालय असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. जनरल परमशिव प्रभाकर कुमारमंगलम यांचे पुत्र सुबरायण बेहराम आणि त्यांची कन्या पार्वती या उद्घाटन समारंभाला उपस्थित होत्या. त्यांच्यासोबतच स्कुल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट आणि रेजिमेंट ऑफ आर्टिलरीचे वरिष्ठ कर्नल कमांडट लेफ्टनंट जनरल एस. हरिमोहन अय्यर (अतिविशिष्ट सेवा पदक**), आर्टिलरी महासंचालक आणि ग्रूप – VI चे कर्नल कमांडट लेफ्टनंट जनरल अदोष कुमार (अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक) यांच्यासह माजी सैनिक तसेच इतर मान्यवरही या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते.


देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल परमशिव प्रभाकर कुमारमंगलम यांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावे साकारण्यात आलेले तोफखाना संग्रहालय हे देशातील अशाप्रकारचे एकमेवद्वितीय संग्रहालय आहे. या सग्रहालयाच्या माध्यमातून देशाच्या तोफखान्याचा समृद्ध इतिहास आणि तोफखान्याचे महत्त्वपूर्ण योगदानाचे मूर्त स्वरुप नागरिकांसमोर मांडण्यात आले आहे. त्यामुळेच नाशिकला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक प्रमुख ठिकाण ठरणार आहे.
१६ नोव्हेंबर १९६८ रोजी जनरल परमशिव प्रभाकर कुमारमंगलम यांनी स्वतः या संग्रहालयाची पायाभरणी केली होती, त्यानंतर २७ सप्टेंबर १९७० रोजी लेफ्टनंट या संग्रहालयाचे उद्घाटन झाले होते. तेव्हापासूनच या संग्रहालयाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला होता. गेल्या काही काळात, पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने जतन संवर्धनाच्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करत तसेच हरित उपक्रम आणि शाश्वत विकासाच्या ध्येय उद्दिष्टांना अनुसरून या संग्रहालाचे अनेकदा नूतनीकरण केले गेले आहे.

या संग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून बाहेर सामाजासोबत जोडले जाण्याच्या उद्देशाने संग्रहालयाच्या आवारात विविध ठिकाणी सेल्फी पॉईंट्स साकारण्यात आले आहेत. या सेल्फी पॉईंट्समुळे संग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांना त्यांचा या भेटीचा अनुभव टिपण्याची आणि तो इतरांसोबत सामायिक करण्याची संधी मिळणार आहे. या संग्रहालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच उमराव सिंग, (व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त) यांच्या पहिल्या महायुद्धातील ऐतिहासिक पराक्रमांच्या, तसेच बांगलादेश मुक्तीसंग्रामाच्या वेळच्या प्रसिद्ध टांगेल हवाई हल्ल्याचे प्रेरणादायी चित्रण प्रदर्शन स्वरुपात साकारण्यात आले आहे.


या संग्रहालयातील तोफांच्या आजवरच्या वाटचालीचे दर्शन घडवणारे प्रदर्शनगृह हे या संग्रहालयाचे ठळक वैशिष्ट्य आहे. या प्रदर्शनगृहात ख्रिस्तपूर्व ४०० वर्षांपासून ते आजच्या समकालीन काळापर्यंत रॉकेट आणि क्षेपणास्त्रांच्या तोफखान्यांमध्ये झालेली प्रगती आणि बदलांचे दर्शन होते. या संग्रहालयात पर्यटकांना इतिहासाचा समृद्ध अनुभव देणारे, पहिल्या महायुद्धापासून ते कारगिल युद्धासारख्या मोठ्या युद्धांमधील शौर्य आणि बलिदानाच्या गाथांना समर्पित स्वतंत्र प्रदर्शनगृही देखील साकारण्यात आले आहे. सियाचिन सारख्या खडतर हिम प्रदेशातील दहशतवादविरोधी मोहिमा, क्रीडा क्षेत्र तसेच विविध मोहिमा आणि कार्यान्वयातील गनर्स (Gunners) अर्थात तोफखाना विभागाच्या दारुगोळा हाताळणाऱ्या / शस्त्रधारी जवानांचे योगदान आपल्यासमोर मांडणारी प्रदर्शनगृहे देखील या संग्रहालयात साकारण्यात आली आहेत.

Related posts

लाडकी बहिण व लाडका भाऊ घोषणा करा ! मात्र पूर्वीच्या घोषणा पूर्ण करा आझाद मैदानातील आंदोलनकर्त्यांचा सवाल

editor

नागपुरात ऑटो आणि बसची जोरदार धडक; दोन लष्करी जवानांचा मृत्यू; सात लोक गंभीर जखमी

editor

अंबादास दानवे पाच दिवसांसाठी निलंबित ; विधान परिषदेत बहुमताने ठराव मंजूर

editor

Leave a Comment