मुंबई २३ मे :
इंडिया आघाडी ओबीसींचा बळी देवून मुस्लीमांचे तुष्टीकरण करते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात याबद्दल आधीच सांगितलं होतं. आज बंगालमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळं ही बाब अधोरेखित झाली.
ममता बनर्जीनी ओबीसी प्रवर्गात मुस्लीमांची बेकायदेशीर भरती केली. परिणामी मुळ ओबीसी हक्कापासून वंचित राहिले, मुस्लीमांनी आरक्षणाचे फायदे घेतले. ओबीसी आरक्षणाची धांदल कलकत्ता उच्च न्यायालयाच्या ध्यानात आली, त्यांनी ओबीसी आरक्षणाला फुली मारली.
मुस्लीम मतांसाठी ओबीसी मुलांच्या भविष्याचा बळी इंडिया आघाडी देते आहे. ममतांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसणारे पवार , ठाकरे काही वेगळे नाहीत. कॉंग्रेसने ओबीसी आरक्षणात मुस्लीम समावेशाची घोषणा केली आहे. हिंदू हटाओ, मुस्लीम फुसलाओ इंडिया आघाडीचं हे धोरण आहे.
बाळासाहेबांचा मुलगा उद्धव ठाकरे या हिंदूद्रोही षडयंत्रात सहभागी आहे. हिंदूंच्या भविष्याला दफन करण्याचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू असे भाजपाचे उत्तर भारतीय मोर्चा प्रदेश अध्यक्ष संजय पांडे म्हणाले.