Civics

कलिना संकुलाची आमदारांकडून पाहणीउच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांची माहिती

Share

मुंबई प्रतिनिधी , ४ जुलाई :

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलमधील समस्यांचा अभ्यास करून सरकारला अहवाल देण्यासाठी दोन्ही सभागृहांतील पाच सदस्यांची एक समिती नेमली जाईल आणि ही समिती संकुलाची पाहणी करेल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

मुंबई विद्यापीठाच्या न्यू गर्ल्स वसतिगृहात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याप्रकरणी भाजपच्या पराग अळवणी आणि अन्य सदस्यांनी प्रश्न विचारला होता. मुंबई विद्यापीठाचा स्तर आज घसरला आहे. जगातील विद्यापिठे आता भारतात येत आहेत. अशावेळी मुंबई विद्यापीठाचा दर्जा सुधारण्यासाठी काही सर्वंकष विचार होणार आहे का? असा प्रश्न भाजपच्या आशीष शेलार यांनी केला.

तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वसतिगृहात दूषित पाणी मिळते याची तक्रार मुलींनी करूनही कोणतीही दखल घेतली गेली नव्हती. शुद्ध पाणीही मुलींना दिले जात नसेल तर दर्जेदार शिक्षण दूरच राहिले, अशी टीका केली. दूषित पाण्यामुळे मुलींच्या वसतीगृहामध्ये विद्यार्थिनींना जुलाब, पोटदुखी, डोकेदुखीचा त्रास झाल्याची तक्रार करत जीर्ण झालेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी काँग्रेसच्या अस्लम शेख यांनी केली.

यावर कलिना संकुलातील सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी नक्कीच पुढाकार घेतला जाईल. या संकुलात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवून झोपड्या हटविणे प्रस्तावित आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

Related posts

महिला स्वच्छताकर्मींनी केला मतदानाचा निर्धार व इतरांनाही केले मतदानाचे आवाहन

editor

शहरी व ग्रामीण भागातील विकास कामे ठप्प

editor

मुंबई मनपाच्या ढिम्म कारभारामुळे महिला गंभीर जखमी

editor

Leave a Comment