मुंबई , १० जुलै : प्रतिनिधि
पंढरपुर येथिल विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांना सुलभ दर्शन मिळावे. यासाठी आता व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. घटनात्मक पदावरील केवळ एका व्यक्तीस थेट प्रवेश आहे. असे असताना खासदार संदीपान भुमरे यांनी आपल्या २५ ते ३० कार्यकर्ते यांच्यासह मंदिरात घुसखोरी केली. यावेळी पोलीस आणि खासदार यांच्यामध्ये काही काळ व्हीआयपी दर्शन आणि घुसखोरी बाबत वाद झाले. मात्र तरीही खासदार घुमरे यांनी कार्यकर्त्यांना घेऊन थेट विठ्ठल मंदिरात शिरकाव केला. परिणामी दर्शन रांगेतील भाविकांनी घुसखोर आणि व्हीआयपी बाबत संताप व्यक्त केला.शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांच्या कार्यकर्त्यांच्या व्हीआयपी दर्शनावरून मोठा वाद सुरू झाला आहे.
दरम्यान याप्रकरणी खासदार भुमरे यांनी घुमजाव करत माझ्यासोबतचे कार्यकर्ते नसून ते वारकरी होते असा दावा केला आहे. आज खासदार संदिपान भुमरे व त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना व्हीआयपी दर्शन दिले आहे. व्हीआयपी दर्शनावरून वाद निर्माण झाला आहे. माझ्यासोबत दर्शनासाठी आलेले कार्यकर्ते नव्हते तर ते वारकरी होते. वारकऱ्यांना कोणताही त्रास झाला नाही. मी स्वतः दर्शन रांगेतूनच दर्शन घेतले आहे. त्यामुळे माझ्या दर्शनामुळे कुठेही वारकऱ्यांना त्रास झालेला नाही, असा दावा ही यावेळी खासदार भुमरे यांनी केला आहे.