politics

मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवली ते ठीक, पण दाढीवाल्यांना मदत करणे चूक ; वक्फ बोर्डाच्या निधीवरून मनसेची टोलेबाजी

Share

मुंबई प्रतिनिधी ,१६ जून :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाढी वाढवली ते ठीक आहे, पण दाढीवाल्यांना मदत करणे चूक, असा खोचक टोला मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना लगावला.

राज्य सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली असता ही घोषणा सध्या चांगलीच वादात सापडली आहे. या प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगले पण दाढीवाल्यांना मदत करणे योग्य नाही, असा टोला महाजन यांनी लगावला.

वक्फ बोर्ड ही घटनाबाह्य संस्था आहे. या देशाचे कायदे वक्फ बोर्डाला लागू होत नाहीत म्हणून ते रद्द केले पाहिजे. वक्फ बोर्डाने जर एखाद्या जमिनीवर दावा सांगितला तर त्या संबंधित व्यक्तीला न्यायालयात जाता येत नाही, वक्फ बोर्डाकडे जावे लागते. नरेंद्र मोदी यांना जनतेने लोकसभेला पुरेसं पाठबळ दिले नाही. नाहीतर हा वक्फ बोर्डच रद्द करण्यात आला असता, असे प्रकाश महाजन म्हणाले.

Related posts

AAP’s Arvind Kejriwal Faces BJP Allegations, Colleague Responds at Joint Press Conference

editor

धर्मवीर- २ चित्रपटातील संवादावरून आनंद दिघे यांचे पुतणे संतापले

editor

राहुल गांधीच्या वक्तव्याचा भाजप कडून निषेध

editor

Leave a Comment