Civics

कल्याणमधील अनधिकृत पब आणि बारवर केडीएमसीची कारवाई

Share

कल्याण प्रतिनिधि,२७ जून :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे, भिवंडी, पुण्यासह आता कल्याणमध्ये देखील अनधिकृत पब व बारवर कारवाई सुरु झाली आहे.


या संदर्भात केडीएमसी आयुक्त इंदूराणी जाखड यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकी दरम्यान शहरात किती बेकायदा ढाबे, बार आहेत याची माहिती घेण्यात आली आहे तसेच या अनधिकृत बार व पब वर आजपासून या कारवाईला सुरुवात झाली असल्याची माहिती आयुक्त इंदुराणी जाखड यांनी दिली आहे.

कल्याणमध्ये एका हुक्का पार्लरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्याची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली. कल्याण पश्चिम येथील हा हुक्का पार्लर असून हा हुक्का पार्लर पहाटे पाच वाजेपर्यंत चालतो. या हक्का पार्लरमध्ये अल्पवयीन तरुण-तरुणी नशा करतात अशी माहिती समोर आली आहे.

याबाबत आयुक्त जाखड यांनी सांगितले की, संबंधित हुक्का पार्लर कल्याण पश्चिमेतील ब प्रभाग कार्यक्षेत्रातील आहे. संबंधित पोलिस अधिकारी, महापालिका आधिकारी, उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी यांच्याकडे त्वरीत माहिती घेऊन कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरातील रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत टपऱ्यावर केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. या कारवाई शिवसेना नेत्या छाया वाघमारे यांनी विरोध केला आहे.

यावर केडीएमसी आयुक्तांनी सांगितले आहे की मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश आहेत. या धर्तीवर कोणतेही अवैध धंदे करु द्यायचे नाहीत. त्या संदर्भातील आदेश महापालिका, पोलिस आणि उत्पादन शुल्क अधिकारी वर्गास दिले आहे. कारवाई कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही.

Related posts

राज्य शासनाच्या प्रचार प्रसार समन्वयकपदी प्रा.डॅा.ज्योती वाघमारे यांची नियुक्ती

editor

मुख्यमंत्री सह्याद्रीतुन बाहेर पडताच रोखला ताफा

editor

धुळेकरांच्या उदासिनतेला कंटाळून नकाणे तलावातील गाळ काढणे बंद करणार- माजी आमदार अनिल गोटे

editor

Leave a Comment