धुळे , दि.16 डिसेंबर :
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी धुळे शहरातील भाजपच्या कार्यालयाला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत पक्षाच्या कार्याचा आढावा जाणून घेतला तसेच यावेळी किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या सेनेचे अस्तित्वच राहणार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आमच्यासमोर महाराष्ट्राचा विकास आणि विस्तार करणे एवढेच ध्येय आहे मंत्रिमंडळाचा विस्तार हे त्या दृष्टीने टाकलेले एक छोटे पाऊल आहे महाराष्ट्रात विकासाच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांनी आकलन केलेली आहे पुढील तीन वर्षात महाराष्ट्र हे देशातील 1 नंबरचे सर्वात विकसित राज्य असेल.
गेल्या पाच वर्षापासून नरेंद्र मोदी असतील देवेंद्र फडणवीस असेल किंवा मी असेल आणि आमचे कार्यकर्ते असतील आम्ही पुकारलेल्या धर्मयुद्धाला यश आलेला आहे. एकीकडे लव जिहाद लँड जिहाद आणि आता वोट जिहाद सुरू आहे 2050 पर्यंत मुंबईत फक्त 54 टक्के हिंदू असतील . मी आता या विषयात लक्ष घालणार असून छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात हे होऊ नये. तसेच ‘एक हे तो सेफ हे’ याचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे.
दादर येथील हनुमान मंदिरात काल झालेल्या प्रकाराबाबत किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून उद्धव ठाकरेंचे गँगस्टर जे करतात त्याला राडा असे म्हणत नाहीत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनाच ही भाषा शोभते. उद्धव ठाकरेंच्या पोराला काय अधिकार आहे ज्यांनी हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकले. तिथे मी गेलेलो असताना मला मारण्यासाठी गाडी पेटवण्याचा प्रयत्न झाला त्या उद्धव ठाकरेंना आता राम का आठवला आपली संस्कृती आहे, आपली शेवटची वेळ आल्यावर आपल्याला राम आठवतो त्यांच्या पक्षाची आता शेवटची वेळ आलेली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या सेनेचा अस्तित्वच नसेल अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे