accident Mahrashtra

मालसाणे शिवारात एस.टी. बसची कंटेनरला धडक; पंधरा जण जखमी

Share

नाशिक, ३ जून :

चांदवड तालुक्यातील मालसाने येथील मुंबई आग्रा महामार्गावरील चौफुली जवळ असलेल्या गतिरोधकाजवळ मालेगावकडून नाशिककडे आज दि. ३ जुन रोजी दुपारी एक वाजता एसटी बस यावल डेपोची बस क्रमांक एम. एच .20 बी. एल. 2656 बु:हाणपूर नाशिक व कंटेनर ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात पंधरा जण जखमी झाले. यातील काही जखमींना उपचारांसाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालय तर काहींना वडाळी भोई व इतरत्न दवाखान्यात उपचारासाठी हलविले आहे.

एसटी बस चालक हा कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याने कंटेनरला पाठीमागून धडक दिली. दरम्यान कंटेनर पुढे निघुन गेल्याने त्याचा नंबर मिळाला नाही. तर या धडकेने बस चालकाचे नियंत्नण सुटून बस दुभाजकावर चढून दुभाजकाच्या मधोमध असलेल्या लोखंडी खांबाला बसने धडक दिली. या धडकेत बस चालकासह बस मधील पंधरा प्रवासी जखमी झाले. त्यापैकी सात जखमींना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

त्यात अभिनंदन नंदकिशोर जोशी रा. मालेगाव, मंगेश भगवान भोई रा. पारोळा , हेमंत पुंडलिक नंदन रा. ताहराबाद, संजय खैरे रा. चिंचवे, डॉ. रोहिणी शिंदे अमृतधाम नाशिक, बस चालक गणेश नामदेव बडगुजर वय ४५ , वाहक अतुल अशोक कोळी यांना मंगरुळ सोमा टोल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ मदत करून व त्यांच्या रुग्णवाहिनीने चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात केले. त्यावेळी चांदवड येथे डॉ. अभिजीत निकम , तसेच डॉ. आव्हाड व चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी यांनी तात्काळ प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक व मालेगाव येथे पाठवण्यात आले आहे.

Related posts

लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या जागा वाटपात अंतर्गत कुरघोडीचा वाद उफाळणार ? पक्षश्रेष्ठींनी जागा वाटपाच्या तिढ्याबाबत विचाराने निर्णय घेण्याची वेळ !भिवंडी विधानसभेत २ आमदार हॅट्रिकवर ,१ चौथ्यांदा नशीब आजमवणार

editor

कलाकारांवरील अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापण्याबाबतचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले निर्देश

editor

अंबानी कुटुंबातर्फे सामुहिक विवाह सोहळा थाटात संपन्न

editor

Leave a Comment