Mahrashtra

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के ; नागरिकांनी घाबरून न जाण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Share

नांदेड़ , १० जुलै :

आज दि.१० जुलै २०२४ रोजी नांदेड शहर व नांदेडमधील सर्वच तालुक्यातून सकाळी ७ :१४ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ४.५ नोंदविण्यात आलेली आहे. भूकंपचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असून नांदेडपरभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झालेली आहे.

नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड,अभिजीत राऊत यांनी केले आहे.

Related posts

अनधिकृत लॅब बाबत विधानसभेत फक्त चर्चाजनतेची लूट व आरोग्याशी खेळ सुरूच

editor

दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 4,99,321 कोटींचे सामंजस्य करार

editor

मुंबईतील बोरवली ते ठाणे या दुहेरी भुयारी मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात – आमदार प्रकाश सुर्वे

editor

Leave a Comment