Mahrashtra

धरणांमध्ये निम्म्याहून अधिक साठा

Share

मुंबई, दि. २३ प्रतिनिधी :

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांच्या परिसरात चांगला पाऊस पडत असून धरणांतील साठ्यात सोमवारी एका दिवसात २१ दिवसांच्या पाण्याची भर पडली. सातही धरणांमध्ये निम्म्याहून अधिक म्हणजेच ५३.१२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांतील पाणीसाठा सोमवारी ५३.१२ टक्क्यांवर पोहोचला. जुलै महिन्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सातही धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात सोमवारी पडलेल्या पावसामुळे सातही जलाशयांतील पाण्यात भरघोस वाढ झाली असून १९२ दिवस पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

धरणक्षेत्रात दमदार पाऊस पडत असून धरणक्षेत्रातील डोंगरातून झिरपणाऱ्या पाण्यामुळे धरणांतील साठ्यात भर पडत आहे.सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे. त्यातुलनेत सध्या सात धरणांत ७ लाख ६८ हजार ८४७ दशलक्ष लीटर पाणीसाठा जमा झाला आहे. सात जलशयांपैकी तुळशी तलाव कठोकाठ भरला आहे. सर्वात मोठे भातसा धरण ५२ टक्के भरले आहे. तर तानसा धरणदेखील ९१ टक्के भरले आहे.सात धरणांतून मुंबईला दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. तर ठाणे,भिवंडी, निजामपूर मनपा क्षेत्रात दररोज १५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो.धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू केली आहे.

मात्र आता धरणांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असल्यामुळे कपात रद्द करण्याची मागणी होऊ शकते किंवा राजकीय दबावही वाढू शकतो. मात्र ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्यास पाणीसाठा वाढणार नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन सावध भूमिका घेत आहे.

Related posts

शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक पुढे

editor

Tragedy Strikes Mumbai: Deadly Billboard Collapse Amidst Ferocious Storm

editor

विविध प्रशासकीय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे सुसूत्रीकरण करण्यासंबंधात उच्चस्तरीय समितीची स्थापना

editor

Leave a Comment