politics

ठाकरे गटाचे सहा खासदार संपर्कात खासदार नरेश म्हस्के यांचा दावा

Share

डॉ. श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद देण्याची कार्यकर्त्यांची इच्छा

मुंबई प्रतिनिधी ,१० जून :

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे निवडून आलेले ९ पैकी ६ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. या सहापैकी दोन खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी शनिवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना केला.मात्र, त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

अठराव्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे सात तर उद्धव ठाकरे गटाचे ९ खासदार निवडून आले आहेत. आता शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे खासदार संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही गटात एकमेकांचे खासदार – आमदार खेचण्यावरून दावे – प्रतिदावे सुरू झाले आहेत.

मशिदींतून फतवे काढून ठाकरे गटाला एकगठ्ठा मतदान झाले.यासाठी लाखो रुपये वाटले गेले. ठाकरे गटाचे उमेदवार जिथून निवडून आले तिथला मूळ मराठी मतदार मात्र त्यांच्यापासून दूर गेला. मुंबई, ठाणे, कल्याण या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार ७ लाखांवर मते मिळवत विजयी झाले. ठाकरे गटाने शिवसेनेच्या मूळ तत्वांशी आणि विचारांशी फारकत घेतल्याचे मतदारांच्या लक्षात आले असून त्यांच्यात पश्चातापाची भावना निर्माण झाली आहे. यामुळे ठाकरे गटाचे आमदार आणि नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेना पक्षाला मिळणारे मंत्रिपद डॉ. श्रीकांत शिंदे यांना देण्यात यावे, अशी इच्छा शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्त्यांच्या या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडणार असल्याची माहिती नरेश म्हस्के यांनी दिली.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील खासदारांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘एनडीए’चे मुख्य नेते म्हणून निवड केली होती. रविवारी ९ जून २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होणार आहे. नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला मंत्रिपद मिळणार आहे. हे मंत्रिपद कल्याणमधून विजयाची हॅट्ट्रिक करणारे डॉ. श्रीकांत शिंदे यांना देण्याची इच्छा शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. श्रीकांत शिंदे हे एक सुशिक्षित, कार्यक्षम आणि संसदरत्न खासदार आहेत, असेही म्हस्के म्हणाले.

Related posts

लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज

editor

Shashi Tharoor Expresses Shock as Former Staff Member Detained for Alleged Gold Smuggling

editor

महाविकास आघाडी तुटेल पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर येणार नाही

editor

Leave a Comment