गोंदिया , १० जुलै :
गोंदिया जिल्हा जंगलाने व्याप्त असा जिल्हा आहे. गोंदिया जिल्ह्यात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा सुरू असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी वन्यप्राणी पाहण्यासाठी येत असतात. या प्रकल्पामध्ये वाघ दिसत असल्यामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वन विभागामध्ये महसूल सुद्धा गोळा होत आहे.
गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये तीन महिने एप्रिल, मे, जून या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे येत असतात. गेल्या वर्षी १५ हजार पर्यटक या तीन महिन्यांमध्ये नवेगाव नागझिराला भेट दिली होती. मात्र या वर्षी पर्यटकामध्ये २० टक्क्यांनी वाढ होऊन १७ हजार ३३२ पर्यटकांनी या तीन महिन्यांमध्ये नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत महसुलामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ३१ लाख ६० हजार रुपये महसूल गोळा झाला होता मात्र यावर्षी पर्यटकांची संख्या वाढल्याने ४२ लाख १७ हजार रुपये एवढा महसूल शासनाला मिळाला. यावेळी विदेशी पर्यटकांनी सुद्धा नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आहे. वाघ दिसत असल्यामुळे आणि इतर प्राणी दिसतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांच्या संख्यामध्ये वाढ झाली आहे. असे नवेगाव नागझिराचे उपसरक्षक क्षेत्र संचालक जयरामे गोडा यांनी सांगीतले .