Civics

झोपू योजनेतील घरे विकण्यासाठी ना – हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने देणार – मंत्री अतुल सावे

Share

मुंबई प्रतिनिधी , ५ जुलाई :

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विक्री करण्यासाठी ना – हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने दिली जाणार असून अर्ज केल्यानंतर ४५ दिवसांत प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विकण्यासाठी लागणारे ना- हरकत प्रमाणपत्रबाबत सदस्य प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. यास मंत्री अतुल सावे यांनी उत्तर दिले.
यावेळी सदस्य भाई गीरकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला. तर प्रवीण दरेकर, कपिल पाटील, जयंत पाटील यांनी प्रश्न मांडले.

मंत्री सावे म्हणाले, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विकण्यासाठीच्या अनेक अटी शिथील करण्यात आल्या आहेत. तसेच ना – हरकत प्रमाणपत्र लवकरच ऑनलाईन पद्धतीने वितरीत करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करणार येणार आहे. तसेच झोपडपट्टी धारक मृत असल्यास त्याच्या वारसाने वारसा प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांनाही ना – हरकत प्रमाणपत्र देण्यात येत असल्याची माहिती यावेळी मंत्री सावे यांनी दिली.

Related posts

मुंबई मनपाच्या ढिम्म कारभारामुळे महिला गंभीर जखमी

editor

कलिना संकुलाची आमदारांकडून पाहणीउच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांची माहिती

editor

गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका

editor

Leave a Comment