politics

आता चाळीसगावचं पार्सल चाळीसगावला पाठवायचा आहे खडसेंच्या आरोपांवर चंद्रकांत पाटील यांचे प्रतिउत्तर

Share

जळगाव, दि.16 नोव्हेंबर :

मारामारी गुंडगिरी करण माझं पिंड नाही, मी 40-45 वर्षे झालं विधानसभा क्षेत्राचं काम करतो या कालावधीमध्ये कोणालाही दमबाजी केल्याचं माझं एकही उदाहरण नाही, कुठेही भ्रष्टाचार केल्याचं माझं एकही उदाहरण नाही, कुणावरही अशा स्वरूपाचे हमले केल्याचे उदाहरण नाही, मी गेल्या मागील पाच वर्षांपूर्वी निवडणुकीमध्ये माझ्या भाषणात सांगितलं होतं जर तुम्ही या चंदू पाटलाला निवडून दिलं तर गल्लोगल्ली गावोगावी गुंडगिरी वाढेल, आज गावोगावी गुंड पोचले जात आहेत पाच ते दहा गुंड प्रत्येक गावात पोचले जात आहेत असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते विधान परिषदेचे आमदार माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर केला आहे.

संवेदनशील मतदान केंद्राची यादी मी निवडणूक आयोगाला पाठवलेली आहे त्या निवडणूक केंद्रांवरती कडे कोट बंदोबस्त ठेवावा अशी मागणी मी निवडणूक आयोगाला केलेली आहे , हा आमदार बाहेरून आला म्हणजे चाळीसगाव चा माणूस मुक्ताईनगर मध्ये येऊन आम्हाला अक्कल शिकवायला लागला हे चाळीसगावचं पार्सल आता चाळीसगावला परत पाठवायचा आहे असा टोला एकनाथ खडसे यांनी विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना लावला आहे.

यावर खडसेंनी केलेल्या आरोपांचे खंडन करताना चंद्रकांत पाटील यांनी ” एकनाथ खडसे यांना जळी स्थळी काष्टी पाश्यानी चंद्रकांत पाटील दिसायला लागलेले आहेत, खडसेंना डोळे जरी लावले तरी मी दिसतो, दिल्लीचे नेतृत्व महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या माणसाने कालपर्यंत खूप मोठ्या गप्पा मारल्या, तो माणूस आज गल्ली गल्ली फिरतोय आणि प्रत्येकाला फोन करून धमक्या देतोय असा गंभीर आलो मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावरती केला आहे.

खडसे 30 वर्षापासून खोटं बोलणारी मंडळी आहे, तुमची बोलण्याची पद्धत तुमची बोलण्याची लँग्वेज किती चांगली आहे सगळ्यांना माहित आहे तुमची विधानसभेची जर भाषण काढून पाहिली तर सर्वांना समजेल, तुम्ही सुसंस्कृत असल्याने 2019 मध्ये लोकांनी तुम्हाला जागा दाखवली आहे, आता 2024 ची सुद्धा तीच गत होणार आहे यात काही शंका नाही, चंद्रकांत पाटील नावाचा सामान्य माणूस आमदार झाल्याचे तुम्हाला खूप मोठे दुःख आणि शैल्य आहे. “

Related posts

हरियाणातील अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर भाजप सरकार अल्पमतात

editor

Karnataka CM Seeks Revocation of MP Revanna’s Diplomatic Passport

editor

Swati Maliwal’s Battle for Justice: Standing Alone Against AAP’s Pressure

editor

Leave a Comment