politics

आता आदेश नाही, मैदानात उतरा अन् ठोकून काढा फडणवीसांचा कार्यकर्त्यांना थेट आदेश

Share

पुणे , दि.२२ :

आगामी विधानसभा निवडणुकीच्य दृष्टीने भाजपाने कंबर कसली आहे. या निवडणुकीत किती जागा लढवायच्या यावर भाजपात अंतर्गत खल चालू आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा कमी झाल्या. महाराष्ट्रातही भाजपाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीतही हीच परिस्थिती उद्भवू नये म्हणून भाजपाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

भाजपाकडून महाराष्ट्र सरकार, तसेच केंद्र सरकारच्या योजनांचा जोमात प्रचार केला जातोय. विरोधकांच्या टीकेला आणखी ताकदीने उत्तर देण्यासाठी भाजपाकडून रणनीती आखली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपले नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विरोधकांच्या आरोपांना तेवढ्याच ताकदीने उत्तर देण्याचा आदेश दिला आहे. प्रत्येकवेळी आदेशाची वाट पाहू नका. थेट मैदानात उतरा, असे फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस काल (२१ जुलै) प्रदेश भाजपाच्या महाअधिवेशनात बोलत होते. यावेळी बोलताना विरोधक खोटा नरेटिव्ह पसरवतात. विरोधक म्हणतात सिलिंडरच्या किमती वाढल्या. आम्ही २०१३ सालच्या सिलिंडरच्या किमती दाखवल्या. त्या सध्याच्या किमतीपेक्षा अधिक होत्या. या किमती दाखवल्यानंतर ते गप्प बसतात. मी आत्मचिंतन करतोय. आपली एक अडचण आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं. पण प्रत्येकजण आदेशाची वाट पाहतो. आदेश आला तर मी उत्तर देईन. नाहीतर देणार नाही, असे प्रत्येकजण म्हणतो, असे फडणवीस म्हणाले.आज तुम्हाला परवानगी देतो. ज्याला बॅटिंग करायची आहे, त्याने करावी. मैदानात उतरा. पण अट एकच आहे. हीट विकेट व्हायचं नाही. जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे सेल्फ गोल करायचा नाही. काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात. ते असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात. बाकी आदेश विचारू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा. तुम्हाला खोटं बोलायचंच नाही. खरं बोलायला विचार करावा लागत नाही. त्यांना खोटं बोलायचं आहे. तुम्हाला खरं बोलायचं आहे. तुम्ही सगळे मैदानात उतरले पाहिजेत, असा आदेशच फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.

Related posts

Supreme Court Declines Urgent Hearing for Arvind Kejriwal’s Bail Extension Plea

editor

दाऊद इब्राहिमलाच क्लीन चिट द्यायचे बाकी आहे – संजय राऊत

editor

Controversy Over Pro-tem Speaker Selection in 18th Lok Sabha

editor

Leave a Comment