ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा
मुंबई प्रतिनिधी , २४ जून :
ओबीसी आरक्षणाला धक्का लागु नये या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा सुरुवाती पासुन पाठिंबा असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज जाहिर केले.
एस.सी.,एस.टी.,ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग करुन आरक्षण द्यावे ही रिपब्लिकन पक्षाची सुरुवातीपासुनची भुमिका आहे.राज्य सरकारने ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भुमिका घेतली आहे.त्यामुळे राज्य सरकारने तातडीने लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची दखल घेऊन उपोषण सोडवावे.अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली आहे.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागु नये ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारची भुमिका आहे.त्यामुळे ओबीसी आणि मराठा समाजातील नेत्यांनी सामंजस्याची भुमिका घ्यावी.ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि मराठा समाजाला हा योग्य ते आरक्षण मिळेल.यांचे राज्य शासनाने खातरी देऊन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे उपोषण थांबवले पाहिजे.असे मत ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केले.