Civics Mahrashtra

पी. डि’मेलो मार्गाला जोडणाऱया १५४ वर्ष जुन्या कर्नाक पुलाची बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्बांधणी

Share

मुंबई, दि.16 जानेवारी :

मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि’मेलो मार्गाला जोडणाऱया १५४ वर्ष जुन्या कर्नाक पुलाची बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्बांधणी सुरू आहे. या प्रकल्प अंतर्गत ५५० मेट्रिक टन वजनाची उत्तर बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) महानगरपालिकेच्या हद्दीत ९.३० मीटरपर्यंत चाचणी स्वरूपात सरकविण्याची कार्यवाही मंगळवार, दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी यशस्वीपणे पार पडली. मध्य रेल्वे प्रशासनाकडून ‘ब्लॉक’ जाहीर झाल्यावर पाच तासांच्या कालावधीत तुळई आणखी पुढे सरकवण्याची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. त्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मध्य रेल्वेसोबत समन्वय साधण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या पूल विभागाने मध्य रेल्वे प्रशासनासह योग्य समन्वय साधून ही कार्यवाही पूर्ण केली आहे.

प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता (पूल) (शहर) राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी, कामगार यावेळी उपस्थित होते.

दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील नागरिकांच्या वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे.

कर्नाक पुलाच्‍या उत्तर बाजूच्‍या लोखंडी तुळई (गर्डर) चे सुमारे ५५० मेट्रिक टन सुटे भाग प्रकल्‍पस्‍थळावर दाखल झाल्‍यावर जोडकाम प्रक्रिया पूर्ण करण्‍यात आली आहे. तद्नंतर, काल (दिनांक १४ जानेवारी २०२५) ‘ट्रायल रन’ करण्‍यात आले आहे. तुळई सरकविण्याचे हे काम तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक आहे. त्यासाठी विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे.

रेल्‍वे हद्दीत तुळई स्‍थापित करण्‍यासाठी ‘ब्लॉक’ मिळण्‍याबाबत बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने मध्य रेल्वे प्रशासनाकडे विनंती केली आहे. रेल्वे ‘ब्लॉक’ मिळाल्यानंतर तुळई स्थापित करण्याची पुढील कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. त्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मध्य रेल्वेसोबत समन्वय साधण्यात येत आहे.

Related posts

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना राज्याच्या प्रगतीला खीळ बसली – प्रवीण दरेकर

editor

जालन्यातील अग्निशमन दलाच्या इमारतीचे छत कोसळले ; एक कर्मचारी जखमी तर चार फायर बुलेटचे झाले नुकसान

editor

लोककल्याणाचा विचार डोळ्यासमोर ठेवून विधानमंडळाची वाटचाल -सभापती प्रा. राम शिंदे

editor

Leave a Comment