Civics Mahrashtra

‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत कांदिवली आणि दहिसर परिसरात वृक्षारोपण

Share

मुंबई, दि.२० जानेवारी :

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत कांदिवली आणि दहिसर परिसरात आज दिनांक २० जानेवारी वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. या शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले आपल्या आईच्या नावाचे फलक वृक्षारोपण करताना सदर प्रत्येक वृक्षाला लावण्यात आले.


वृक्षारोपणाकरिता आर उत्तर विभागातील महानगरपालिका शाळेचे विद्यार्थी, विबग्योर हायस्कूल, रुस्तमजी इंटरनॅशनल, आर दक्षिण विभागातील स्वामी विवेकानंद शाळा (कांदिवली) चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उप आयुक्त (परिमंडळ सात) डॉ. भाग्यश्री कापसे यांनी शालेय विद्यार्थ्यांना ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेची विस्तृतपणे माहिती दिली. प्रत्येक विद्यार्थ्याला ही संकल्पना आपल्या परिसरामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये रुजवण्याकरिता कापसे यांनी आवाहन केले.


सदर उपक्रमादरम्यान दहिसरमध्ये बकुळ, पेरू, ताम्हण, बहावा, करंज अशा विविध झाडांचे रोपण करण्यात आले. तसेच कांदिवली परिसरातही पाच हजार झाडांचे रोपण करण्यात आले. सहायक आयुक्त नयनीश वेंगुर्लेकर, मनीष साळवे आदींसह स्वामी विवेकानंद शाळेचे विश्वस्त उपस्थित होते. शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आईच्या नावाचा फलक असलेल्या झाडासहीत सेल्फी घेऊन आनंद साजरा केला.

Related posts

कल्याण बस डेपोत प्रवाशांची मोठी गर्दी

editor

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य राज्याचा कारभार करण्यासाठी मार्गदर्शक…!

editor

‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी शेतकरी, पोलिस, स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केली गणरायाची आरती

editor

Leave a Comment