जालना दि. 17 ऑक्टोबर :
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता दरम्यान कोणत्याही राजकीय पक्षाने, उमेदवाराने किंवा राजकीय पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका हद्दीतील कोणत्याही शासकीय इमारतीवर पोस्टर बॅनर किंवा घोषणाबाजी, राजकीय पक्षाचे घोषवाक्य इत्यादीचा वापर करू नये. प्रॉपर्टी डिफेंसमेन्ट अॅक्ट नुसार कायद्याने सक्त मनाई असून अशा प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करू नये असे अवाहन मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी केले आहे.
राजकीय पक्षांना प्रचारासाठी ज्या सभा वैगरे घ्यायचे असतील त्याची महानगरपालिका किंवा निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे रीतसर परवानगी घेऊन बॅनर , पोस्टर लावावेत ; अन्यथा आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अनाधिकृत बॅनर,भित्तीपत्रके,जाहीरात, झेंडे ई अॅड पोस्ट या मनपा कडून परवानगी शिवाय लावू नयेत. प्रत्येक जाहीरातीवर प्रकाशक आणि मुद्रकाचे नाव प्रकाशित करणे बंधनकारक असल्याचे मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितले आहे.