Civics

मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आवारात मोबाईल नेण्यास प्रतिबंध

Share

पुणे , दि. 19 नोव्हेंबर :

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आवारात मतदान केंद्र अध्यक्ष, सूक्ष्म निरीक्षक वगळता उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, मतदार आदींना मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मतदान केंद्रावर मोबाईल सापडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात ५६४ मतदान केंद्रे असून मतदारसंघात ६ लाख ६३ हजार ६२२ मतदार आहेत. यामध्ये ३ लाख ४८ हजार ४५० पुरुष, ३ लाख १५ हजार ११५ महिला, तर ५७ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. या मतदान केंद्रावर छायाचित्रीकरण करण्यास बंदी असून मोबाईल, स्मार्टफोन, स्मार्टवॉच, वायरलेस सेट यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास सक्त मनाई आहे.

मतदानाच्या दिवशी अनावधानाने एखाद्या मतदाराने मतदान करण्यासाठी मोबाईल सोबत आणल्यास तो मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या अंतरावर ठेवावा लागेल. सर्व उमेदवार आणि मतदारांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करावे असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिले आहे.

Related posts

नाले तुंबून नागरिकांच्या घरात पाणी घुसल्यास, दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुदडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी- रोहिदास मुंडे

editor

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आपदग्रस्तांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार- मंत्री अनिल पाटील

editor

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणेला सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री शिंदेच्या सूचना

editor

Leave a Comment