पुणे , दि.25 ऑक्टोबर :
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात असून , भरारी पथकेही तैनात करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात पोलिसांनी एक गाडी अडवली असता, त्यात कोट्यवींची रोकड सापडली होती. निवडणुकांच्या कामासाठीच ही रोकड पाठविण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी या रोकडचे वाहन पाहून केला होता.
त्यानंतर, आज पुण्यात सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटींचे सोने पकडले गेले आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.
सातारा रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास नाकाबंदी पोलिसांनी कोट्यवधीचे सोने जप्त केले आहे. याबाबत, आता पुढील तपासणी सुरू असून पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तपासणीवेळी हा टेम्पो अडवला. त्यामध्ये पांढऱ्या पोत्यात बॉक्स आढळले, त्यानंतर चालक आणि आणखी एक जण यामध्ये होता, त्यांच्याकडे चौकशी केली, त्याची तपासणी अद्याप चालू आहे. हे जवळपास १३८ कोटी रूपयांचं सोनं असल्याची माहिती समोर आली आहे.