Uncategorized

पालघरमध्ये पावसाची तुफान बॅटिंग ; देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Share

पालघर(प्रतिनिधी) दि २१ जून :

पालघरमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांजवळ अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या सेवेवर झाला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंतची लोकल सेवा संथ गतीने सुरू आहे. डहाणू-विरार लोकल सेवा २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहे.पालघर जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्याने जनजीवनावर याचा परिणान दिसून आला. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. रेल्वच्या वाहतुकीवर देखील याचा परिणाम दिसून आला आहे. पालघर येथील मुसळधार पावसाचा सर्वाधिक परिणाम पश्चिम रेल्वेवर दिसून आला. मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळा लगत पाणी साचले आहे. तर देहर्जे नदीवर बांधलेला पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पालघर-मनोर वाडा हा संपर्क तुटला आहे.

वाडा-मनोर महामार्गावरील देहर्जे नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे; मात्र हे काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही.


रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे नदीला पूर आला आहे, त्यामुळे नदीपात्रातील पर्यायी पूल पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक बंद पडली आहे. यामुळे पालघरकडे जाणारी वाहने, तसेच नोकरीसाठी जाणाऱ्या नागरिकांना २० ते २५ किमीचा फेरा मारावा लागत आहे, याबद्दल नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.


वाडा तालुक्यात तानसा, वैतरणा, पिंजाल व देहर्जे या नद्या आहेत. या नद्यांवरील पुलांना शंभर वर्षांचा कालखंड लोटला आहे. भिवंडी- वाडा़- मनोर या रस्त्याचे मागील दहा-बारा वर्षांपूर्वी चौपदरीकरण झाले, त्यामुळे या चारही नद्यांवर नवीन पूल बांधण्यात आले आहेत. तानसा व वैतरणा नदीवरील पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला; मात्र पिंजाल व देहर्जे नदीवरील पूल अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहेत, त्यामुळे येथील वाहतूक ही जुन्याच पुलावरून सुरू आहे. हे दोन्ही पूल कमकुवत असून दोन महिन्यांपूर्वी देहर्जे पुलाला तडे गेल्याने या पुलावरून वाहतूक बंद केली होती. तसेच, नदीपात्रातून पर्यायी वाहतूक सुरू आहे; मात्र दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू आहे.आता पावसाळा सुरू झाला तरी हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.

दरम्यान, पावसापूर्वी हे काम पूर्ण होऊ न शकल्याने मुसळधार पावसाने देहर्जे नदीला पूर आल्याने पर्यायी रस्ता पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली असून वाहनचालकांना २० ते २५ किमी अंतरावरून फेरी मारून जावे लागत आहे. परिणामी, वेळ व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे, त्यामुळे नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

Related posts

Across Mumbai 9 Jan Marathi

editor

Amit Shah Criticizes Arvind Kejriwal and Affirms India’s Stand on PoK

editor

कॉपर केबलचे आमिष दाखवून मुंबईच्या पार्टीला घातला गंडा; लुटीतील तिघे १२ तासांतच पोलिसांच्या ताब्यात

editor

Leave a Comment