Share
मुंबई,१७ जून :
काल मध्यरात्री नागपुरात हिट अँड रनचा आणखी एक प्रकार घडला आहे. दिघोरी चौकात, भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या ८ मजुरांना चिरडल्याची घटना घडली आहे. यातदोन मजुरांचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा रात्री उशिरा दिघोरी चौकात एका भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या मजुरांवर गाडी घालत त्यांना चिरडले आहे. यात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी त्वरित कार चालकाला अटक केली आहे. भूषण लांजेवार असे या कार चालकाचे नाव असून हा चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता अशी माहिती पोलीस निरीक्षक विजय बीजे यांनी दिली आहे