Education Mahrashtra

श्री छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरंध एच .एस. सी .परीक्षा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम.

Share

मुंबई प्रतिनीधी: महेश कदम

रायगड शिक्षण प्रसारक मंडळ महाडचे श्री. छत्रपती माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय वरंध, विद्यालयाचा एच. एस .सी. २०२४ परीक्षेचा निकाल यावर्षी देखील शंभर टक्के लागला, असून सदर परीक्षेत ७८ विद्यार्थी बसले होते .

या विद्यालयामध्ये विज्ञान शाखा असून या शाखेतील सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. कुमारी ढेरे वैष्णवी विजय ही ६८.५०% गुण मिळवून प्रथम आली तर कुमारी झांजे सृष्टी भाऊ ही ६५.६७% गुण मिळवून द्वितीय तर कुमारी मोरे मनाली महेंद्र ही ६५% गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. यावर्षी देखील गुणांच्या बाबतीत मुलींनी बाजी मारली.

विज्ञान विषयासाठी सुसज्ज अशी लॅब, ग्रंथालय, मेहनती आणि तज्ञ अशा प्राध्यापकांची मेहनत या सर्व गोष्टींमुळे विद्यालयाची निकालाची परंपरा कायम राहिली आहे.

विद्यालयाचे सभापती शहाजी (बापू) देशमुख, विश्वस्त आणि आदर्श ग्रामपंचायत वरंध चे सरपंच जयवंत (तात्या) देशमुख यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक इनामदार सर व सेवक वृंदांचे विद्यालयात भेट देऊन अभिनंदन केले. तसेच रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हनुमंत (नानासाहेब) जगताप आणि सर्व विश्वस्त यांनी देखील विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक, सभापतींचे अभिनंदन केले. अशी माहिती माजी विद्यार्थी चंद्रकांत साळुंखे यांनी दिली.

Related posts

Study Reveals Cancer Preventive Properties of Metformin

editor

नाग‍री सुविधा केंद्रात नागरिकांसाठी कमी वेळेत, कमी खर्चात नागरी सुविधा उपलब्‍ध करून द्याव्‍यात ; महानगरपालिका आयुक्‍त भूषण गगराणी यांचे निर्देश

editor

रुग्णसेवेचे अखंड व्रत घेतलेले केईएम रुग्णालय हे मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने आधारवड – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

editor

Leave a Comment