Civics Mahrashtra

कोपरखैरणे विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

Share

नवी मुंबई ,२७ मे :

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभागा अंतर्गत बजरंग महादेव गोळे, रूम नंबर ३३५ सेक्टर-१५ कोपरखैरणे, नवी मुंबई व कारभारी रामभाऊ ढोले, रूम नंबर १२२सेक्टर ०५ कोपरखैरणे, नवी मुंबई. यांनी महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे आर.सी.सी. स्वरूपाचे बांधकाम सुरू केले होते.

अनधिकृत बांधकामास कोपरखैरणे विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५४ अन्वये अनुक्रमे दि.२९/०२/२०२४ व दि.२६/०३/२०२४ रोजी नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.

  सदरची दोन्ही अनधिकृत बांधकामे आज दिनांक २४/०५/२०२४ रोजी निष्कासित करण्यात आलेली आहेत. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, ८ मजूर, १गॅस कटर,२ ब्रेकर,१ पीकअप व्हॅन कारवाई करीता वापर करण्यात आले. तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस पथक तैनात होते.

  यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

Related posts

ठाण्यातील इस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत असणाऱ्या मॉल समोर भीषण अपघात

editor

‘मिशन धाराऊ’ लोकचळवळ म्हणून राबवावी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

editor

40 वर्ष प्रकल्पाच्या नावाखाली पडीक असलेल्या शेतजमिनी पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या, आनंदराज आंबेडकर यांची बेणसे सिध्दार्थ नगर गावातून भिमगर्जना

editor

Leave a Comment