Civics

दीक्षाभूमीतील भूमिगत वाहनतळ कामाला स्थगिती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Share

मुंबई प्रतिनिधी ,२ जुलाई :

नागपूर येथील दीक्षाभूमी विकास आराखडा हा दीक्षाभूमी स्मारक समितीने अंतिम केला आहे. त्यासाठी राज्य सरकारने केवळ निधी उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. मात्र, त्याठिकाणी होत असलेल्या भूमिगत वाहनतळाला काही जणांचा विरोध होत आहे. लोकभावना विचारात घेऊन या कामाला स्थगिती देण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत दिली. काँग्रेस आमदार डॉ. नितीन राऊत आणि भाजपच्या नारायण कुचे यांनी यासंदर्भातील मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता.

दीक्षाभूमी हे संपूर्ण देशासाठीचे स्मारक आहे. तेथील विकास कामे करण्यासाठी दीक्षाभूमी स्मारक समितीने विकास आराखडा अंतिम केला आहे. त्यानुसार तेथे कामे सुरू आहेत. मात्र, अशा विकास कामामध्ये मतमतांतरे असणे योग्य नाही. त्यामुळे याप्रकरणी आंदोलन करणारे आंदोलक आणि स्मारक समिती यांची एकत्रित बैठक घेतली जाईल. तोपर्यंत भूमिगत वाहनतळ कामाला स्थगिती देत आहे. याबाबत, एकत्रित बैठकीनंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Related posts

सरकारी नोकरीच्या परीक्षा शुल्क कपातीसाठी लढा देणार-ठाकरे गटाच्या अनिल परब यांची ग्वाही

editor

एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाईत ८५ हजार दंडात्मक रक्कम तसेच ३९.७५० किलो प्लास्टिक जमा

editor

‘विक्रोळी आणि भांडूप भागातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे: प्रशासनाचे आवाहन

editor

Leave a Comment