Share
मुंबई प्रतिनिधी , ९ जुलाई :
विधान परिषदेवर नव्याने निवडून आलेले निरंजन डावखरे आणि जगन्नाथ अभ्यंकर यांना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी सदस्यत्वाची शपथ दिली. सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून दिला.
यावेळी डॉ.गोऱ्हे यांच्यासह सभागृहातील उपस्थित सर्व सदस्यांनी दोन्ही सदस्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. निरंजन डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून तर अभ्यंकर हे मुंबई विभागीय शिक्षक मतदारसंघातून निवडून आले आहेत.