Business Mahrashtra

‘ताज केवळ हॉटेल नाही, तर प्रत्येक भारतीयाचा अभिमान’

Share

मुंबई, दि.10 फेब्रुवारी :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रे, मुंबई येथे ‘ताज बॅण्डस्टॅण्ड’ हॉटेलचे भूमिपूजन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी टाटा समूह, इंडियन हॉटेल्स कंपनी यांचे नवीन प्रकल्पासाठी अभिनंदन केले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाटा समुहाचे सर्वेसर्वा दिवंगत रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा दिला. हे हॉटेल रतन टाटा यांच्या महत्त्वपूर्ण स्वप्नांपैकी एक होते, ते आता प्रत्यक्षात उतरत असल्याचा आनंद होत आहे. या हॉटेलमुळे वांद्रे परिसराच्या सौंदर्यात भर पडेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह नागपूरमध्ये ताज हॉटेल सुरु करावे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ताज हॉटेलच्या सुरुवातीचा प्रवास अतिशय थक्क करणारा आहे, या प्रवासाची सुरुवात प्रत्येक भारतीय नागरिकासाठी प्रेरणादायी आहे. ताज केवळ हॉटेल नसून प्रत्येक भारतीयाचा अभिमान असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

यावेळी मंत्री आशिष शेलार, टाटा समूहाचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन, द इंडियन हॉटेल्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Related posts

धरणांमध्ये निम्म्याहून अधिक साठा

editor

‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत कांदिवली आणि दहिसर परिसरात वृक्षारोपण

editor

मृद व जलसंधारण विभागात रूजू झाले ६०१ अधिकारी, मुख्यमंत्र्यांचे हस्ते नियुक्तीपत्राचे वितरण

editor

Leave a Comment